नांदेड(प्रतिनिधी)- मुदखेड शहरात चाकुचा धाक दाखवून 1 लाख 73 हजार 12 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारहाण करून 6 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडून 5 लाख 99 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.
चिकना ता.धर्माबाद येथील रहिवासी कुलदीप लक्ष्मण खंदारे(21) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते भारत फानानान्स कंपनी शाखा मुदखेड येथे व्यवस्थापक फिल्ड असिस्टंड या पदावर काम करतात.ते दि.23 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वाजेच्यासुमारास न्याहाळी ते मुदखेड रोडवरील नगर परिषदेचे सार्वजनिक शौचालयाजवळी रोडवर त्यांच्या मोटार सायकल क्रमांक एम.एच.24 ए.सी.5553 वर बसून कंपनीचे कर्ज वसुली करीत असतांना एका मोटारसायकलवर दोन अज्ञात इसम आले आणि त्यांनी त्यांच्या गळ्याला चाकून लावून जबरीने त्यांच्याकडील 1 लाख 65 हजार 677 रुपये रोख व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल (टॅब) किंमत 7335 रुपये असा ऐवज असलेली बॅग जबरीने घेवून पसार झाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुदखेड पोलीसांनी गुन्हा क्रमांक 258/2022 नुसार कलम 392, 34 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक वाटणे हे करीत आहेत.
आनंदनगर येथील रहिवासी जितेंद्रसिंह जिवनसिंह माळाकोळीकर (47) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राज मॉल समोरील येवनकर स्टीलच्या दुकानासमोर ते ऍटोची वाट पाहत थांबले असता नाईक चौकाकडून अचानकपणे दोन 25 ते 30 वर्षीय अनोळखी युवक मोटारसाकलवर आले व त्यांना रोडवर पाडून हातातील स्टीलच्या कड्याने डोक्यावर मारून पॅन्टच्या खिशातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमत 3 हजार रुपये, पॉकिट ज्यामध्ये 3 हजार रुपये रोख रक्कम व एटीएम कार्ड, आधारकार्ड व पॅनकार्ड असा एकूण 6 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी जबरीने हिसकावून नेला आहे. याबाबत विमानतळ पोलीसांनी गुन्हा क्रमांक 439/2022 कलम 394, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक जाधव हे करीत आहेत.
देगलूर येथील रहिवासी राम हनमंतराव पाटील (40) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे साईनगर देगलूर येथील घर आणि त्यांच्या घराजवळील बालाजी ऐकारे यांचे आनंदनगर देगलूर येथील घर अज्ञात चोरट्यांनी दि.22 डिसेंबर 2022 ते 23 डिसेंबर 2022 च्या 8.30 वाजेदरम्यान घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिणे व रोख असा एकूण 5 लाख 99 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. त्यानुसार देगलूर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 555/2022 कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरिक्षक सोहन माछरे हे करीत आहेत.