लेख

अनेक चक्रव्युहांना तोडून तीन वर्ष पुर्ण करणारे पोलीस निरिक्षक चिखलीकर

मागील दहा वर्षानंतर नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर सलग 3 वर्ष 1092 दिवस विराजमान असलेले पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी एक नवीन विक्रम तयार केला आहे. 24 डिसेंबर रोजी त्यांनी हा विक्रम पुर्ण करत आहेत. आणखी 4 महिने 18 दिवस पुर्ण केले तर तो विक्रमांचा बादशाह होईल आणि या पुढे शिल्लक राहिलेली सेवा येथेच पुर्ण केली तर तो विक्रम बहुदा पुढच्या हजारो वर्षात मोडणारा कोणी जन्म घेणार नाही. या आपल्या कार्यकाळात त्यांनी आपल्या खुर्चीला, आपल्या जबाबदारीला दिलेला न्याय कोणीच दिला नसेल आणि कोणी देणार पण नाही. अशा या अजातशत्रुला उर्वरीत पोलीस सेवेसाठी आणि त्यानंतरच्या भविष्यातील जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त कराव्यात म्हणून केलेला हा शब्द प्रपंच.विचारवंत म्हणतात आपल्याला उंची प्राप्त करायची असेल तर धोकेबाज नव्हे तर गरुड व्हा..अशाच आपल्या विचारांनी स्थानिक गुन्हा शाखेचा कार्यभार चालवितांना द्वारकादास चिखलीकर यांनी किती मेहनत घेतली असेल. देवाने आम्हाला इतरांच्या निर्णयांवर जगण्यासाठी या जगात पाठविलेले नाही ही बाब आपल्या जीवनात प्रत्यक्षात जगत स्वत: कसे निर्णय घ्यायचे हे शिक्षण जगाला देण्यासाठी तयार झालेला हा गुरूदेव भविष्यातील जीवनात अनेकांचा मार्गदर्शक असेल.


24 डिसेंबर 2019 रोजी नांदेड जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा शाखेत देगलूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस निरिक्षक द्वारकादास गोविंदरावजी चिखलीकर यांची नियुक्ती झाली. कायद्यांच्या अडचणी लक्षात घेत अत्यंत जलदगतीने काही तासातच मध्यरात्री त्यांनी स्थानिक गुन्हा शाखेचा कार्यभार स्विकारला. त्या काळी अनेक जण या खुर्चीचे दावेदार होते. पण द्वारकादास चिखलीकर यांच्यामध्ये असलेली योग्यता आणि त्यांची निर्णय क्षमता लक्षात घेवून नियुक्ती त्यांनाच देण्यात आली. पुढे येणारी संकटे लक्षात घेवून त्यावेळी त्वरीतप्रभावाने कार्यभार बदलीची प्रक्रिया पुर्ण करण्यात आली. कोणत्याही संकटाशिवाय मिळते तो विजय असतो अनेक संकटांशी सामना करून मिळवलेला विजय हा ईतिहास घडवतो. या शब्दांप्रमाणेच मागील 1092 दिवसांमध्ये किती संकटे आली तरी द्वारकादास चिखलीकर यांनी रिकाम्या भांड्यावर कधीच झाकण टाकले नाही आणि चुकीच्या लोकांची कधीच पाठ राखण केली नाही. काही अपवाद आहेत. जे पोलीस अधिक्षक कार्यालयातील 1 नंबर कक्षात जाऊन बसतात ते खाली आल्यावर 11 नंबरवाल्यांना त्यांचे आदर करावेच लागतात हे सुध्दा तेवढेच सत्य आहे. जीवनाच्या धाकधुकीत असे अनेक प्रसंग द्वारकादास चिखलीकर यांनी सांभाळले आणि आपल्या पोलीस विभागाची शान राखतांना असे काही केले असेल जे आम्हाला अपवाद वाटतात. अपवाद कामे सुध्दा करावीच लागतात. या पध्दतीने आम्ही लिहिलेल्या अपवादांवर आणि द्वारकादास चिखलीकर यांच्या त्या निर्णयांवर आमचा काही आक्षेप नाही. आम्ही फक्त यासाठी याची मांडणी केली आहे की, आमच्या वाचकांना अशा अपवाद प्रसंगांना आपलेसे करून जगण्याची वेळ आली तर त्यांना सुध्दा त्यातून मार्ग काढता आला पाहिजे.
एखादी खुर्ची मिळाली तर आपल्यापेक्षा त्या खुर्चीची शान राखणे ही सर्वात मोठी जबाबदारी त्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीची असते. 1 सप्टेंबर 2018 ते 24 डिसेंबर 2019 या दरम्यान या खुर्चीवर तीन अधिकारी बदलले. त्यातील एकाचा वेळ तर फक्त 14 दिवसांचा आहे. त्यामुळे झालेली घाण साफ करणे ही सर्वात मोठी जबाबदारी होती. ही घाण त्यांच्याच कार्यालयात तयार झालेली होती, त्यांच्याच लोकांनी केलेली होती. त्याचा शोध घेत-घेत ती घाण दुर करून त्या जागी सुगंध पसरविण्यासाठी त्यांना खुप मेहनत घ्यावी लागली. त्यांच्याही कार्यालयात बरेच सुर्याजी पिसाळ त्या काळी होते, आजही आहेत, पुढेही राहणार आहेत. पण या सुर्याजी पिसाळांसोबत जगणे आवश्यकच होते. आपण चांगले आहोत की, वाईट याचा विचार चिखलीकरांनी कधीच केला नाही. कारण त्यांना माहित होते की, लोकांना गरज पडेल तेंव्हा मी चांगला, गरज संपली की मी वाईट होणार आहे. जीवनाच्या प्रवासात आपण पायी चाललो तर तो प्रवास असतो. हृदयाने चालतो तेंव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चाललो तेंव्हा ती वारी असते. अशा प्रकारे आपल्या स्थानिक गुन्हा शाखेच्या कार्यकाळाला त्यांनी वारीचे स्वरुप दिले. या दरम्यान त्यांनी मी ब्रिजवर आहे असे म्हणणाऱ्यांना काहीच म्हटले नाही. पण ज्यांनी इमानदारीने आपल्या कामासह इतर कामे सुध्दा केली त्यांच्यावर काही नतद्रष्टांच्या सांगण्यावरून अन्यायही केला. या घटनेला आम्ही गव्हासोबत किडे सुध्दा दळले जातात. म्हणून विश्लेषणात्मक लिहिण्याची इच्छा ठेवत नाही. कक्ष क्रमांक 11 मध्ये काय चालले आहे याची प्रत्यक्षात देखरेख करा आणि ज्यांच्यावर मागील तीन वर्षात अन्याय केला. त्यांना निदान शाब्बासकीची थाप तर द्या अशी भावना नक्कीच आहे. काही नमुने आपल्याला सांगतात की असे घडले, त्याने असे केले, त्याने असे करायला पाहिजे, त्याने माझे ऐकले नाही, मी तुमच्यावतीनेच सांगले होते या शब्दांवर विश्र्वास गरण्याऐवजी प्रत्यक्षात बोलून, करून पाहा. तर सत्य कळेल. ब्रिजवाला तर ब्रिजवालाच आहे याची जाण आपल्याला झाली नाही का? आपल्यासोबत तर पुर्वी पासूनच होता. या व्यतिरिक्त तुमच्या मातहतांसाठी लेखणी वापरली तर आमच्या लेखणीतील शाई कमीत कमी 200 वेळेस भरावी लागेल तरी सुध्दा ते पुराण पुर्ण होणार नाही. काही जणांनी तरी आपण एप्रिल 2022 मध्ये खुर्ची सोडावी अशी इच्छा व्यक्त केली होती. पण त्यांच्या इच्छेचा झालेला हिरमोड पाहुन सुध्दा ते आज आनंद व्यक्त करतात यातच तुम्ही कमावलेले आहे.
जिल्ह्यात कार्यरत असलेले आपले सहकारी अधिकारी आपण लावा-लाव्या करता असा आरोप आपल्यावर केला. पण या तीन वर्षात आपण माणुस काय आहे? हे महत्वाचे नसून त्या माणसात काय आहे ही बाब महत्वपूर्ण असल्याची ओळख स्वत:मध्ये करून घेतली. म्हणूनच म्हणतात ना की खोट बोलल तर पाप लागत पण आपण सत्य बोलता म्हणून त्यातून मिर्च्या लागतात. या मिर्च्या लागण्याचा अनुभव आपण बरेचदा घेतलेला आहे. त्यात काही झिरो पोलीसांनी सुध्दा व्हाटसऍप माध्यमातून लावा-लावी करण्याचा प्रयत्न केला होता पण तो आपण समर्थपणे हाणून पाडला.हे प्रयत्न करतांना आपण जीवन जगलात. जीवन कापले नाही आणि त्यातच खरा आनंद आहे. कोणी आपल्याला पुर्णपणे समजू शकले नाही कारण पुस्तकाच्या प्रत्येक पानात आपले व्यक्तीमत्व वेगळे होते ही आपली जीवनाची पुस्तक आहे. आपण नेहमीच स्वत:ला झेपणाऱ्या गोष्टी करत गेलात त्यामुळे त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकत आपोआपच आपल्यात सुदृढ होत गेली. इतरांना आनंद मिळावा म्हणून स्विकारलेले दु:ख आपल्याला नेहमीच आनंद देत गेले आणि यानंतर आपण नांदेड जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हा शाखेचे तीन वर्ष पुर्ण केलात याचे अभिनंदनच आहे. अनेक घटनांमध्ये आपण भरपूर बाबी नाकारलेल्या आहेत. यासाठीच विचारवंत म्हणतो की, सुखाचा आनंद असा आहे की, जे मिळते त्याचा आनंद घेणे आणि दु:खाचा अर्थ असा आहे की मला अजून पाहिजे आहे. हे विचारवंतांचे वाक्य आपण तंतोतंत खरे ठरवले आणि जे मिळत आहे त्यात आनंद घेण्याचा कोणताही प्रसंग, एक क्षण सुध्दा आपण सोडलेला नाही आणि त्यामुळेच आनंदाची ही वाहती नदी आपल्या दारापासून कधी दुर गेलीच नाही. स्थानिक गुन्हा शाखेचे काळ कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे तीन वर्षात पुर्ण होतो. आपल्याला उर्वरीत पोलीस खात्यातील कालखंड अशाच आनंदाच्या प्रसंगात सांभाळता यावा यासाठी आपल्या आजपर्यंतच्या अनुभवांची मदत मिळणार आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे 1094 दिवसांत अर्थात 3 वर्षात आपण एवढ्या गुन्हेगारांना गजाआड केले आहे की, मागील एक खंडी वर्षात अर्थात 20 वर्षात असे कोणत्याही पोलीस निरिक्षकाच्या काळात झालेले नाही. ती सर्व गुन्हेगार मंडळी आपल्या नावाचे शंख करत आज तुरूंगात भाकरींचा आनंद घेत आहेत. काही गुन्हेगारांना पकडण्यासाठी आपल्याला गोळीबार करावा लागला. त्यात सुध्दा आपल्या कपाळावर कधी आढी आली नाही.आपले लेकरू दवाखान्यात असतांना सुध्दा आपण 1500 किलो मिटरचा प्रवास करून 9 गुन्हेगार पकडले होते आणि ही बाब आपण सांगितली तेंव्हाच समाजाला कळली. ती सांगतांना आपण स्वत:पेक्षा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबीचे प्रसारण करावे यावर लक्ष ठेवले. त्याप्रसंगी सुध्दा सुर्याजी पिसाळ आणि त्याच्या एका सहकाऱ्याने पर्यायी व्यवस्था करून आपल्याला शह देण्याचा केलेला प्रयत्न कमी लोकांना माहित असेल परंतू त्यांचा तो प्रयत्न आपल्या मेहनतीमुळे हाणून पाडला गेला. संपत्ती विषयक गुन्ह्यांमध्ये सुध्दा मागील वीस वर्षाच्या काळात जेवढी संपत्ती आपण पुन्हा जनतेला मिळवून दिली ते सुध्दा कधी घडले नव्हते. अनेक अर्ज आले त्यांचा निकाल लावतांना आपण त्या अर्जदाराला न्याय दिला. कोण्या डॉक्टर आणि कंपाऊंडर कडून आलेले अर्ज सुध्दा आपण मोठ्या धैर्याने वाचले पाहिले आणि त्यावर काम केले. त्यात सुध्दा तुम्ही अन्याय होवू दिला नाही. कक्ष क्रमांक 11 मधील अनेक जण आपली माहिती गुन्हेगारांना देतात याची जाणीव आपल्याला होती. म्हणून आपण त्यांच्यासोबत केलेली वागणूक एवढी छान होती की, गुन्हेगार तर सोडाच गुन्हेगाराची हवा सुध्दा तुमच्या कर्तव्याला बाधा आणू शकली नाही. त्यातील एक प्रसंग उल्लेखीत करावा वाटतो. आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी पंजाब येथून आणलेल्या दोन गुन्हेगारांना न्यायालयात हजर करे पर्यंत कोणालाही याची माहिती मिळाली नाही. त्या ठिकाणी आलेल्या एका झिरो पोलीसाला आपण आणि आपल्या अधिकाऱ्यांनी एखाद्या विदुषकाप्रमाणे त्याची तारांबळ उडवली आणि स्वत: एक दुसऱ्याकडे पाहुन स्मित हास्य करत होतात तो प्रसंग जीवनात पोलीसाने कसे वागावे हे शिकवणारा आहे. कक्ष क्रमांक 11 मध्ये असणाऱ्या काही जणांनी आपल्या पुर्वी पोलीस निरिक्षक आणि कक्ष क्रमांक 11 यांची केलेली विक्री आपण येण्यापुर्वीच आपल्याला माहित होती आणि त्यामुळे आपण आपले असे होणार नाही याची ठेवलेली दक्षता आपल्याला तीन वर्ष पुर्ण करण्यास सहाय्यक ठरली. फुलांची वृक्षे दररोज फुले तयार करतात. त्यांची फुले माणसे तोडतात पण त्या फुलांच्या तोडण्यामुळे वृक्ष कधी नाराज होत नाही तो पुन्हा नवीन फुले तयार करतो आणि माणसांना सुगंध तर देतोच पण कधी-कधी अर्थसंचय करण्यास मदत करतो. आपली सुध्दा काही वृत्ती अशीच आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलात एका सुर्याजी पिसाळाने आपल्याला दिलेला त्रास वास्तव न्युज लाईव्हलाच नव्हे तर संपुर्ण जिल्ह्यातील पोलीस दलाला माहित आहे. काय झाले त्याचे आपल्या नंतर नांदेड जिल्ह्यात आला आणि आपल्या अगोदर निघून गेला.कारण त्याला माहित नव्हते की, शब्दांचा एक स्वाद आहे बोलण्याच्या अगोदर त्याचा स्वाद आपण घेतला पाहिजे जर तो स्वाद आपल्याला चांगला नाही वाटला तर तो दुसऱ्यांदा सुध्दा चांगला वाटणार नाही. म्हणूनच त्यांनी शब्दांचा स्वाद न घेता त्याचा केलेला प्रसार त्याच्याच अंगलट अनेकदा आला. जातीवाचक उल्लेख करून सुध्दा बोलला होता पण झालेल्या बदलीच्या ठिकाणी जाण्याची हिंम्मत नव्हती कारण तेथे बसलेला बाप होता. म्हणून आपली बदली रद्द करून घेवून दुसरीच जागा निवडली आणि ती मिळविण्यात त्याला यश आले. आता तेथे काय खोटा गुन्हा दाखल करील आणि खोटा गुन्हा, चौकशी याबाबत आपल्याकडे असलेले अनुभव एवढे आहेत की, त्याची तर वाट लागेल.  असा प्रसंग पुन्हा कधी आला तर आपण लक्षात ठेवा की, कधी लोकांना वाटते की आता तमाशा होईल पण अशा अनेक प्रसंगी आपण गप्प राहुन सुध्दा ती बाजी पलटू शकतो हे लक्षात ठेवा.


पोलीस दलातील काम करतांना काही जणांनी आपला सुध्दा वापर केला पण तो करू देणे आपली गरज असेल परंतू हा वापर होत असतांना माझा वापर  करू देतांना तो वापर कोणाच्या तरी भल्यासाठी होता याची जाण आपण ठेवली आणि तो वापर होवू दिला. याप्रसंगी उल्लेख करावासा वाटतो की, अपमानाचा बदला भांडण करून घेण्यापेक्षा त्या व्यक्तीपेक्षा आपण जास्त यशस्वी बनून सुध्दा घेवू शकतो. आपण जेंव्हा उंच सीडी चढत आहोत तर मागे सुटणाऱ्या लोकांबद्दल व्यवहार चांगला ठेवा कारण सीडीवरून खाली उतरतांना तीच सर्व मंडळी जी मागे राहिली होती ती आपल्याला रस्त्यात पुन्हा भेटणार असते हे लक्षात ठेवा. कधी-कधी खरे ऐकण्याची सवय लावा 11 नंबरमधला आपला चमच्या काही बोलला तर ते खरे नसते वास्तव जाणून घेत राहा आणि मग त्यावर आपला निर्णय देत जा. कायद्याची एबीसीडी माहित नसणारे आपल्या नावाखाली इतरांना कायदा शिकवतात. ते तीथे काय काम करण्यासाठी आले आहेत याचीच जाणीव त्यांना नसते. मी याला ते दिले, माझ्यामुळे त्याचे असे झाले असे सांगत आपले गैरसमज तयार करतात आणि त्या गैरसमाजातून आपण इतरांबद्दल निर्णय घेतांना काहीसे नक्कीच डगमगता म्हणून आपल्याला सांगाचे आहे की, लहानपणी खरे बोलण्यास शिकवले जाते परंतू खरे ऐकण्यास कोणी शिकवत नाही याची नक्कीच तुम्हाला गरज आहे.
1094 दिवस अर्थात तीन वर्षाच्या कालखंडात आपण आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वागतांना मी खुर्चीचा सेवक आहे व्यक्तीचा नाही हे अनेक प्रसंगातून दाखवून दिले. खुर्चीवर बसणारा व्यक्ती हा माझ्यासाठी आदरणीयच आहे. हे दाखवतांना आपल्याला अनेकदा तारांवर कसरत करावी लागली. आपल्या मनसुब्यांमध्ये दम होता म्हणून त्या मनसुब्यांसमोर अनेक इमारती झुकल्या आणि आपला नांदेड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा शाखेतील कार्यकाळ घोड-दौड करत 1094 दिवसांपर्यंत पोहचला. आपण आपली तुलना कधीच इतरांसोबत केलेली नाही. बहुदा आपल्याला माहित असेल की, प्रत्येक फळाचा स्वाद हा वेगळा असतो आणि यामुळेच आपल्याला प्रत्येक स्वादाला काय वागणूक द्यायची हे माहित होते आणि म्हणूनच हा आपला कार्यकाळ अत्यंत शानदारपणे सुरू आहे. काहींना वाटते की आम्ही चेहरा बघून बोलतो परंतू आजच्या या शब्द प्रपंचातून पुन्हा एकदा सांगू इच्छीतो की आम्ही आरसा आहोत जे दिसेल तेच लिहिणार आहोत. किती जणांना आपण गांधीजी दिले त्यांची संख्या एवढी आहे की, आम्हाला आमचे गणीत कच्चे असल्याने आम्हाला ते लिहिता येणार नाही. काही जणांनी तुमच्या वहिणीसाठी तरी विचार करा असे सांगून आपल्या पुढे हात पसरले त्या राक्षसांनी पुन्हा आपल्याविरुध्द शरसंधान करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आपण त्या चरित्रहिन माणसाची केलेली हिवशी तो अजूनही विसरला नसेल. तरी आपण त्यातून अत्यंत सुखरुपपणे पुढे चालत आपली पोलीस जबाबदारी पुर्ण करतांना त्याला कोठेच धक्का लागू दिलेला नाही.
आपल्या कार्यालयात एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने काही पत्रकारांसमोर सांगितले होते की, तुम्ही माझी बातमी लिहित नाही काय? मला त्याचा उपाय येतो. हिरव्या रंगाचा एक गांधीजी आणि निवेदनाची झेरॉक्स दिल्यावर बातम्या छापून येतात. हे आपले वाक्य त्या अधिकाऱ्याने अनेकदा वापले होते. पण पत्रकार म्हणू की झिरो पोलीस त्याला याचे उत्तर देण्याची हिंम्मत झाली नाही. उर्वरीत कालखंडामध्ये तरी आपण झिरो पोलीसांपासून दुर राहावे ही अपेक्षा नक्कीच आहे.या शब्द प्रपंचातून कोणाला काय घ्यायचे ते घेतील आपण मात्र सकारत्मकतेचा विचार करा.आपल्याबद्दल सुध्दा नकारात्मक शब्द आम्ही लिहिलेले आहेत पण आता थोड्याच महिन्यांमध्ये आपली पोलीस सेवा संपणार आहे तरी पण आमचे नकारात्मक शब्द आपल्या पोलीस सेवेनंतरच्या जीवनात सुध्दा आपल्या कामी येतील.स्वत:बदल आमचे म्हणणे असे आहे की, आच्या शब्दांची जाण नसणारे, शब्दांची ओळख नसणारे असे म्हणतील की, आम्ही आपली प्रशंसा करत आहोत आहो पण सत्य हे आहे की, एक विचारवंत सांगतो की,  तुम्हारी तारीफ करणा मेरी मजबुरी नहीं है यकीन मानो तुम काबीले तारीफ हो…

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *