ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

सत्यशोधक पोलीस निरिक्षकांनी महिलेचा अर्ज चौकशीवर ठेवला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब सत्य शोधतात म्हणूनच त्यांनी एका महिलेची तक्रार दाखल केलेली नाही. त्या संदर्भाची नोंद सुध्दा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या डायरीत आहे. पण या प्रकरणात एक पोलीस कर्मचारी त्या महिलेच्या पतीला 30 हजार रुपये घ्या मात्र तक्रार देवू नका असा सल्ला पण देत आहे. अशा बहुरंगी आयामाचे पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
या घटनेची सविस्तर माहिती अशी आहे की, दि.13 डिसेंबर 2022 रोजी आशा नारायण सावळे यांच्यावतीने आलेल्या तक्रारीनुसार राजरत्न डुमणे, त्यांची पत्नी शिला डुमणे आणि अजय व अमोल अशा चार जणांनी आशा सावळे यांच्या घरात बेकायदेशीररित्या घुसून त्यांना मारहाण केली, धमक्या दिल्या. यावरुन नांदेड ग्रामीण पोलीसांनी राजरत्न डुमणे व इतर तिघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 452, 323, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 732/2022 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार शेषराव शिंदे यांच्याकडे आहे.
त्या दिवशी डुमणे परिवाराला सुध्दा तुमची काय तक्रार आहे ती द्या त्यावर विचार करू असे सांगण्यात आले होते.पण तुम्ही तक्रार घेत नाहीत मी पोलीस अधिक्षकांकडे जावून तक्रार दाखल करतो असे राजरत्न डुमणेने सांगितले होते त्याची नोंद नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीत करण्यात आलेली आहे.
त्यानंतर दि.14 डिसेंबर रोजी राजरत्न डुमणे यांनी एक अर्ज पोलीस अधिक्षक कार्यालयात दिला. त्या अर्जात लिहिलेल्याप्रमाणे घोरबांड साहेबांनी त्याला सांगितले की, तु नजर मिटवत नसशिल तर तुझ्याविरुध्दही गुन्हा दाखल होईल. तुझी मस्ती जीरवण्यासाठी आरोपींकडून तक्रार घेवून तुझ्यावर गुन्हा दाखल करील असे सांगितले आहे. त्यानंतर त्यांच्या पत्नीने 15 डिसेंबर रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयात दिलेल्या अर्जानुसार 11 डिसेंबर रोजी त्यांच्यासोबत काही जणांनी अन्याय केला. त्यात चार जणांची नावे आहेत. त्यातील एक अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले.
या दरम्यान एक पोलीस अंमलदार राजरत्न डुमणे यांना फोन करतो तो त्यांना समजून सांगत आहे की, 30 हजार रुपये घ्या आणि प्रकरण मिटवून टाका. तक्रार देण्याअगोदर तासभर विचार करा, तुमच्या कोण्या तरी जवळच्या माणसाचा सल्ला घ्या, तक्रार आता दिली काय, एक तासानंतर दिली काय आणि उद्या दिली काय, तक्रार तर दाखल होतेच. पण राजरत्न डुमणे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत असे त्या ऑडीओवरुन दिसते.
पण आज वृत्तलिहिपर्यंत महिलेच्या तक्रारीचा कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही म्हणजे सत्यशोधक असलेल्या श्री.अशोकरावजी घोरबांड यांनी महिलेचा गंभीर अर्ज चौकशीवर ठेवलेला आहे. त्यांच्या पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाबाबत त्यांनी अशीच आपली वृत्ती ठेवली तर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्कीच राम राज्य येईल.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *