नांदेड (प्रतिनिधी) धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि – भारतरत्न प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या दि. १७ डिसेंबर रोजी डॉ. आंबेडकरनगर येथे समाज प्रबोधनात्मक बुद्ध-भीमगीतांची आदरांजली आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती आयोजक राहुल सोनसळे यांनी दिली आहे.
महावीर सोसायटी कमानीच्या बाजूला डॉ. आंबेडकरनगर येथे शनिवार दि. १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन भदंत पय्याबोधी थेरो यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंचित बहुजन आघाडीचे नेते प्रा. राजू सोनसळे यांची तर प्रमुख उपस्थिती म्हणून इंजी. राज अटकोरे, इंजि. प्रशांत इंगोले यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी धम्मदीक्षा लातुरकर यांच्या बूद्ध-भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक राहुल सोनसळे यांच्यासह प्रतिक मोरे, राहुल चिखलीकर, अडो. यशोनील मोगले, रुपेश सोनसळे, आकाश जोंधळे, राहुल घोडजकर, भीमा पोहरे , अतिश ढगे, अभय सोनकांबळे, भीमराव बुक्तरे , महेश पंडित, मंगेश खंडागळे, रितेश गुळवे, साई पाटील, ऋषभ महादळे ,मारुती डोईबळे, सचिन वायवळे ,अमर जोंधळे ,नवनाथ वाकोडे, गौरव जोंधळे आदींनी केले आहे.