ताज्या बातम्या नांदेड

बळीरामपूर ग्रामपंचायत सरपंच पदाच्या उमेदवार मेघना गौडेवार यांना विजयी करा – विजय सोनवणे

नांदेड(प्रतिनिधी)- शहरालगत औद्योगिक वसाहत असलेल्या बळीरामपूर ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून मेघना गौडेवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडणूक प्रचाराचा नारळ येथील महादेव मंदिरात रिपाइंचे महाराष्ट्र संघटक विजय सोनवणे यांच्या हस्ते फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे.

यावेळी पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटक विजय सोनवणे यांनी पक्षाचे ध्येय धारणे सांगून मेघना गौडेवार यांच्या पेन निशाणीवर मतदान करुन प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन केले. दरम्यान पक्षाच्यावतीने बळीरामपूर भागामध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होतेेेे. रॅलीदरम्यान भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, संत रविदास महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी विजय सोनवणे, जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर, शुभम चौदंते, मारोती जकवाड, तुकाराम कदम, ममता गुंडाळे, नागनाथ म्यानेवर, दिगंबर शिरमेवार, सविता चितलेवार, रत्नमाला गड्डपवार, सचिन कांबळे, खुशाल शरमा, सरबजितसिंघ काचवाले, सुरेश चव्हाण, ललीता म्यानेवर, मीनाक्षी पोल्सवार, सुरेश जिंदम, सुरेखा चव्हाण, आशिष कोल्पेकवार, सुरेश जिंदंम, Dr. अनिल सरोदे, छाया बत्तलवार, शारदा सिरमेवार आदीसह बळरामपूर परिसरातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधून विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली तसेच गावातील पाण्याची समस्या तथा अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा व सभागृह बांधून देण्याची ग्वाही जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोनकर यांनी दिली.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *