नांदेड(प्रतिनिधी)-आज 8 डिसेंबर संत संताजी जगनाडे महाराजांचा जन्मदिन पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपल्या सहकाऱ्यांसह अभिवादन केले.
आज संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनी पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी त्यांचे सहकारी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरिक्षक प्रशांत देशपांडे, स्थानिक गुन्हा शाखेचे द्वारकादास चिखलीकर, नियंत्रण कक्षातील दिपक बोरसे, सहाय्यक पोलीस निरिक्षक तथा जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे यांच्यासह अनेक अधिकारी, अनेक पोलीस अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी, मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, संजय सांगवीकर, विनोद भंडारे आदींनी उत्कृष्टपणे केले.
महापालिकेत “संत जगनाडे महाराज” यांना अभिवादन
महापालिकेत आज दि.८ डिसेंबर 2022 रोजी सकाळी अकरा वाजता अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या हस्ते “संत जगनाडे महाराज” यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मुख्य प्रशासकीय इमारत , प्रशिक्षण हॉल,तिसरा माळा , येथे यावेळी उपायुक्त निलेश सुंकेवार, मुख्य लेखापरीक्षक टी.एल.भिसे, सुधीर इंगोले, महेश असणे यांच्यासह कर्मचारी यांची उपस्थिती होती.