नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील विमानतळ पोलिस ठाण्याच्या मुद्देमाल रूममध्ये मागील सात वर्षापासून जमा करण्यात आलेला 1 कोटी 14 लाख 72 हजार 320 रुपयांचा गुटखा हा प्रतिबंधित पदार्थ जाळून नष्ट करण्यात आला.
शहरातील विमानतळ पोलिस ठाण्यात 1915 विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला 1 कोटी 14 लाख 72 हजार 320 रुपयांचा गुटखा न्यायालयाचा मंजुरी आदेश प्राप्त करून विमानतळ चे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे, अन्न सुरक्षा अधिकारी एस. व्ही. कनकावाड, सोबत पंच साक्षीदार, पोलीस ठाणे विमानतळ येथील मुद्देमाल पोलिस अंमलदार रमेश अस्वरे, बाबा गजभारे, शिवाजी अडसुळे, पल्लवी देशपांडे, मुंडे आदींच्या उपस्थितीत जनतेला आणि रहिवाशांना त्या आगीपासून आणि धुरापासून काही धोका होणार नाही अशा निर्मनुष्य ठिकाणी नेऊन हा जवळपास 1 कोटी 15 लाख रुपयांचा गुटखा जाळून नष्ट करण्यात आला आहे.