नांदेड(प्रतिनिधी)-अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या कुशल नेतृत्वात नांदेडमधील नांदेड ग्रामीण पोलीसांनी अत्यंत जोरदार कामगिरी करत 3 हजार 360 रुपये किंमतीच्या 48 देशी दारुच्या बॉटल्या पकडल्या आहेत.
पोलीस अंमलदार अतुल नागनाथ सातारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.3 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास शिवशंकर पेट्रोलपंपसमोर त्यांनी दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.पी. 5588 ला थांबवून त्याची विचारणा केली. या गाडीवर नागोराव दिगंबर पुयड हे व्यक्ती स्वार होते. त्यांच्याकडे एका थैल्यात काय आहे याची तपासणी केली असता त्यात 48 देशी दारुच्या बॉटल्या सापडल्या. या देशी दारु बाटल्यांची किंमत 3 हजार 360 रुपये असल्याचे लिहिलेले आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 716/2022 महाराष्ट्र दारु बंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कदम यांनी अवैध रित्या देशी दारु बाळगणाऱ्या नागोराव दिगंबर पुयडला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 41(अ) 1 प्रमाणे नोटीस देवून सोडले आहे.पोलीसांनी 3 हजार 360 रुपयांच्या देशी दारु बाटल्यांसोबत नागोराव पुयड यांची 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी सुध्दा पकडली आहे. या जोरदार कामगिरीचे कौतुक केलेच पाहिजे.
