नांदेड(प्रतिनिधी)- हिंगोली येथून नांदेडकडे येणाऱ्या बस प्रवासी महिलेच्या बॅगमधून दागिने चोरी करणाऱ्या एका महिलेला स्थानिक गुन्हा शाखेने पकडून चोरीमधील 46 ग्रॅम सोन्याचे दागिणे किंमत 2 लाख 48 हजार 400 रुपयंाचे जप्त केले आहेत. या महिलेसोबत त्यावेळी इतर तीन महिला होत्या.
दि.8 सप्टेंबर रोजी अर्चना अशोक बंडे या महिला हिंगोली ते नांदेड हा प्रवास एस.टी.बसमध्ये करून महाराणा प्रताप चौकात उतरल्या.त्यांना नंतर लक्षात आले की, आपल्या बसमधील सह प्रवासी महिलांनी आपल्या बॅगमधील 14 तोळे सोन्याचे दागिणे चोरले आहेत. विमानतळ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा क्रमांक 306/2022 दाखल झाला. दि.3 डिसेंबर 2022 रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळालेल्या माहितीनुसार या चोरी करणाऱ्या तीन महिलांमधील दुर्गा राम कांबळे (24) रा.शांतीनगर इतवारा ही आहे. तिला ताब्यात घेवून पोलीसांनी विचारपुस केली असता तीने 46 ग्रॅम सोन्याचे दागिणे, 2 चैन आणि एक मिनी गंठण असा ऐवज तिच्याकडून जप्त केला आहे. या ऐवजाची किंमत 2 लाख 48 हजार 400 रुपये आहे.या महिलेच्या इतर तीन साथीदार चोर महिला कविता (25), रेखा (45) आणि सुनिता (40) सर्व रा.पेंढारची झोपडपट्टी जि.वर्धा अशा आहेत. या पकडलेल्या दुर्गा राम कांबळेला पुढील तपासासाठी स्थानिक गुन्हा शाखेने विमानतळ पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, खंडेराव धरणे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार विठ्ठल शेळके, विलास कदम, रणधिर राजबन्सी, विलास कदम, मोतीराम पवार, महेश बडगु, हेमंत बिचकेवार आदींचे कौतुक केले आहे.
