नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील दोन पोलीस अंमलदारांनी महाराष्ट्र पोलीस नेमबाजी स्पर्धेत दोन पदके प्राप्त केली आहेत. क्युआरटी पथकातील शंकर भारती यांना सुवर्ण पदक आणि ज्ञानोबा चौंडे यांना कास्य पदक प्राप्त झाले आहे.
दि.29 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 दरम्यान पुणे येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 येथे महाराष्ट्र पोलीस नेमबाजी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमध्ये नांदेड येथून पोलीस अधिकारी विठ्ठल घोगरे, पोलीस अंमलदार शंकर भारती, ज्ञानोबा चौंडे, केशव अवचार, हनमंत पाखलवार हे नांदेड जिल्ह्याच्यावतीने सहभागी झाले होते. या स्पर्धांमध्ये पोलीस अंमलदार शंकर भारती यांनी 15 मिटर पिस्टल कॉटींग पोझीशन या नेमबाजी प्रकारात सुवर्ण पदकावर आपले नाव अंकीत केले. दुसरे पोलीस अंमलदार ज्ञानोबा चौंडे यांनी पिस्टल सनॅप फायर या नेमबाजी प्रकारात कास्य पदाकावर आपले नाव कोरले.
विजयी स्पर्धकांना आज दि.3 डिसेंबर रोजी राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 1 चे समादेशक प्रविणकुमार पाटील, नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्र येथील प्राचार्य रामचंद्र केंडे यांच्या उपस्थितीत पदके प्रदान करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त करणारे नांदेड जिल्हा पोलीस दलातील क्युआरटी पथकात कार्यरत पोलीस अंमलदार शंकर भारती यांची निवड अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेत करण्यात आली आहे. नेमबाजीच्या अखील भारतीय स्पर्धा तामिळनाडू राज्यात होणार आहेत.
नांदेड पोलीस परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, खंडेराय धरणे, पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड, सचिन सांगळे, अश्र्विनी जगताप, चंद्रसेन देशमुख, डॉ.सिध्देश्र्वर भोरे, पोलीस निरिक्षक संजय हिबारे, अभिषेक शिंदे, शिवाजी डोईफोडे, सोहन माच्छरे, द्वारकादास चिखलीकर, संतोष तांबे, प्रशांत देशपांडे, नानासाहेब उबाळे, आनंदा नरुटे, डॉ.नितीन काशीकर, सुधाकर आडे, अनिरुध्द काकडे, भगवान धबडगे, मोहन भोसले, महेश शर्मा, अनिल चोरमले, शरद मरे, माणिक बेद्रे, राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे, सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मांजरमकर, माधव पुरी, विश्र्वास कासले, सुरेश थोरात, शिवाजी लष्करे, रवि वाहुळे, विशाल भोसले, पांडूरंग माने, शिवराज जमदडे, संजय निलपत्रेवार, आर.एस.मुत्तेपोड, शिवसांब स्वामी, बाळू गिते, चंद्रकांत पवार, पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे, प्रविण आगलावे, विशाल सुर्यवंशी, शेख असद, गणेश गोटके, विजय पाटील, संजय अटकोरे, एकनाथ देवके, सुनिल भिसे, मिलिंद सोनकांबळे, आनंद जोंधळे, मुख्यालयातील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार आदींनी शंकर भारती आणि ज्ञानोबा चौंडे यांनी मिळवलेल्या सुवर्ण आणि कास्य पदकासाठी त्यांचे अभिनंदन केले आहे. वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने सुध्दा पदक प्राप्त करणाऱ्या या दोन पोलीस अंमलदरांचे अभिनंदनच.शंकर भारती यांना महाराष्ट्राच्या नेमबाजी संघात स्थान मिळाले आहे. ते अखिल भारतीय नेमबाजी स्पर्धेत सुध्दा यशस्वी व्हावे आणि पदकांची कमाई करावी अशी शुभकामना.
