नांदेड(प्रतिनिधी)-वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला आणि तीन वर्षापासून फरार असलेला एक आरोपी स्थानिक गुन्हा शाखेने गजाआड केला आहे.
दि.1 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, विलास कदम, गणेश धुमाळ, शेख कलीम हे गस्त करत असतांना त्यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांनी नंदीग्राम सोसायटीमधून प्रफुल्ल उर्फ अर्जितसिंग गजानन चव्हाण (23) मुळ रा. रामनगर ता.हदगाव जि. नांदेड यास ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता पेालीस ठाणे शिवाजीनगर, भाग्यनगर, अर्धापूर या ठिकाणी अनेक गुन्हे दाखल असल्याची आणि तो मागील अनेक दिवसांपासुन फरार असल्याची माहिती मिळाली. तेंव्हा पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांनी सविस्तर अहवालासह पकडलेला प्रफुल्ल चव्हाण पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीसंाच्या स्वाधीन केला आहे.
