ताज्या बातम्या नांदेड

स्वप्नील नागेश्र्वरचे सात मारेकरी स्थानिक गुन्हा शाखेने गजाआड केले

नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून डंकीनजवळ आणून गोदावरी नदी काठी स्वप्नील नागेश्र्वरचा खून करणाऱ्या जमा पैकी 7 जणांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने 48 तासांच्या आत जेरबंद केले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड शहरात प्रेमी युगलातील युवकाचा खून 21 नोव्हेंबर रोजी गोदावरी नदी काठी, उवर्शी मंदिराजवळ असलेल्या दर्गाहसमोर झाला. या मयत स्वप्नील शेषराव नागेश्र्वर (30) वर्ष यास एका जमावाने त्याच्या प्रेमीकेसह विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उचलून आणले होते. प्रेमीकेचीही बेअब्रु केली आणि स्वप्नील नागेश्र्वरचा खून केला. याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 398/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 364, 143, 147, 148, 149 नुसार दाखल झाला.
घडलेला प्रकार हा जातीय तेढ निर्माण करणारा होता त्यामुळे पोलीसांना हा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणणे आव्हान होते. पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या पथकाने जमा केलेल्या माहितीनुसार आणि त्या ठिकाणी उपलब्ध झालेले सीसीटीव्ही फुटेज यांच्या आधारावर ही माहिती प्राप्त केली की या प्रकरणातील मुख्य आरोपी शहबाज खान एजाज खान(24) रा.पक्कीचाळ हा आहे. 23 नोव्हेंबर रोजी शहबाज खानला ताब्यात घेवून घडलेल्या गुन्ह्याबद्दलची माहिती सविस्तरपणे मिळवली तेंव्हा पोलीसंाना समजले की, हा गुन्हा घडविण्यात महम्मद सद्दाम महम्मद साजीद कुरेशी (20) रा.मिलगेट, महम्मद उसामा महम्मद साजीद कुरेशी (20) रा.सोमेश कॉलनी, शेख अयान शेख इमाम (20) रा.आसरानगर, सोहेल खान साहेब खान (19) रा.सुंदरनगर, सय्यद फरान उर्फ साहिल सय्यद मुमताज (19) रा.मोमिनगल्ली मुखेड ह.मु.आसरानगर, उबेद खान युनूस खान (23) रा.चौफाळा यांचा सहभाग होता. या सर्व सात मारेकऱ्यांना स्थानिक गुन्हा शाखा पोलीसांनी जेरबंद करून पुढील तपासासाठी विमानतळ पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, खंडेराव धरणे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, दत्तात्रय काळे, गोविंदराव मुंडे, पोलीस अंमलदार संजय केंद्रे, गंगाधर कदम, विलास कदम, मोतीराम पवार, हेमंत बिचेकवार, दिपक ओढणे, राजू सिटीकर, महेश बडगु यांचे कौतुक केले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *