नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रवादी कॉंगे्रस पार्टी सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष जानबाजी मस्के व कार्याध्यक्ष राजेंद्र नवघरे यांच्यावतीने पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी दि.23 नोव्हेंबर रोजी ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
राष्ट्रवादी कॉंगे्रस सेवा दल ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रमेश गांजापूरकर यांनी प्रसिध्दीसाठी पाठविलेल्या पत्रकानुसार राष्ट्रवादी कॉंगे्रस पार्टी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष जानबाजी मस्के आणि कार्याध्यक्ष राजेंद्र नवघरे हे 23 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांच्या अध्यक्षतेत विष्णु कॉम्प्लेक्स आयटीआय येथील राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंगे्रस पार्टी सेवा दलाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिनिधी व जिल्ह्यातील सर्व फ्रंटसेलच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंगे्रसचे जिल्हा सरचिटणीस प्रा.डी.बी. जांभरूनकर, राष्ट्रवादी कॉंगे्रस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष रमेश गांजापूरकर यांनी केले आहे.
