नांदेड,(प्रतिनिधी)-आज दुपारी चार ते 4.30 वाजेच्या सुमारास नदीकाठील उर्वशी मंदिरात जवळ सैलानी बाबा दर्गा समोरच्या भागात काही हल्लेखोरांनी एका तीस वर्षे युवकाचा खून केल्याचा प्रकार घडला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज दुपारी चार ते चार तीस या वेळे दरम्यान उर्वशी मंदिर, गोदावरी घाट येथे असलेल्या सैलानी बाबा दर्गा समोरच्या जागेत एक युवक मरण पावलेल्या अवस्थेत दिसला. घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाणे वजीराबाद आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मरण पावलेल्या युवकाचे नाव स्वप्निल शेषराव नागेश्वर वय तीस वर्ष राहणार मालटेकडी नांदेड असे आहे. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. वृत्तलिहीपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.
घटनास्थळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार स्वप्निल नागेश्वरचे प्रेम संबंध त्याच्या मृत्यूसाठी कारण ठरले आहे. मारेकर्यांनी त्याला ज्योती टॉकीज जवळून पकडून आणून मारहाण केली आहे. मारहाणी दरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे. कोणीही प्रशासकीय अधिकारी मात्र प्रेमसंबंधाच्या शब्दांना दुजोरा देत नाही. प्राप्त झालेल्या माहितीनुसार काही मारेकऱ्यांची नावे पोलिसांना माहित आहेत. बहुदा उद्याची पहाट होण्याअगोदर सर्व मारेकरी गजाआड असतील.