क्राईम ताज्या बातम्या

किवळा-वडेपुरी रस्त्यावर लुट करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-वडेपुरी-किवळा रस्त्यावर जबरी चोरी करणाऱ्या दोन जणांना जनतेने पकडल्यानंतर आज लोहा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एल.वैद्य यांनी या दोन दरोडेखोरांना दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
काल दि.19 नोव्हेंबर रोजी वडेपुरी-किवळा रस्त्यावर कॅनॉलजवळ दोन दरोडेखोरांनी एका दुचाकी स्वाराला थांबवून त्याची लुट केली. ही घटना पाहणाऱ्या काही लोकांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला तेंव्हा हे दरोडेखोर दुचाकीसह कॅनॉलमध्ये पडले आणि जनतेने या लोकांना पकडले. सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल भोसले आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी पकडलेल्या मेहंदी हसन बाबर अली(43), जावेद जाफरी बाली अली (37) व्यवसाय धातूच्या अंगठ्या विक्री करणे रा. चिदरी रोड, हुसेनी कॉलनी, बिदर राज्य कर्नाटक या दोघांना लोहा न्यायालयात हजर केले. न्या.एस.एल.वैद्य यांनी या दोघांना दोन दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.
संबंधीत बातमी….

दरोडा टाकून पळणारे चोरटे पडले कॅनॉलमध्ये जनतेने पोलीसांच्या ताब्यात दिले

 

 

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *