

नांदेड(प्रतिनिधी)-सांगली शहरात 185 ग्रॅम सोन्याची चोरी करून नांदेडला आलेल्या त्या चोरट्याला सांगली पोलीसांनी नांदेड स्थानिक गुन्हा शाखा पथकाच्या मदतीने सांगली पोलिसांनी पकडले आहे.
दि.18 नोव्हेंबर रोजी सांगली शहरात एका दुकानातून 185 ग्रॅम सोन्याचे दागिणे चोरीला गेले. त्याची किंमत 3 लाख 50 हजार रुपये आहे अशी माहिती नांदेडच्या पोलीस विभागाने दिली आहे. तो चोरी करणारा आरोपी नांदेडला आला असा त्याचा माग काढत सांगली शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नांदेडला आले. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी सांगली पोलीसांच्या मदतीसाठी पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार गुंडेराव करले, गंगाधर कदम, संजय जिंकलवाड, महेश बडगु यांना पाठवले. सांगली आणि नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखा पोलीसांनी नांदेडच्या सराफा लाईनमधून उस्मान अली मंडल (23) रा.भास्करा जि.हुबळी राज्य पश्चिमबंगाल यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे झालेल्या चौकशीनंतर पोलीस पथकाने त्याच्याकडून सांगलीतील चोरीला गेलेले 184 ग्रॅम सोन्याचे दागिणे किंमत 3 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. त्याला पुढील तपासासाठी सांगली पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.