नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या सिमेवरील तेलंगणा राज्यालगत वाताणूकुलीत कक्षात एक मोठा जुगार अड्डा सुरू करण्याची तयारी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील डॉ.परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण यांच्या पुढाकारातून सुरू आहे. ज्या माणसाने नांदेडच्या एका सुर्याजी पिसाळवृत्तीच्या एका अधिकाऱ्यासोबत मिळून अधिकाऱ्यांना आणि जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. त्याचे लाड करणाऱ्या या पोलीसमधील डॉक्टरचे ऑपरेशन होण्याची गरज आहे. त्याच्यासोबत त्याच्या कंपाऊंडरांची सुध्दा तपासणी विशेष पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी केली पाहिजे.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला तेलंगणा राज्य सुरू होते. त्या ठिकाणी एका दरवाज्यातून महाराष्ट्र आणि एका दरवाज्यातून तेलंगणा अशा पध्दतीने एक जुगार अड्डा सुरू करण्याच्या हालचाली स्थानिक गुन्हा शाखेच्या पुढाकाराने मोठ्या जोरात सुरू आहेत. हे गाव धर्माबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. या गावाचे नाव नायगाव असे आहे. या ठिकाणी जुगार अड्डा चालविण्याचे नेतृत्व स्थानिक गुन्हा शाखेतील डॉ.परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण हे करत आहेत. त्यांना त्यांचे कंपाऊंडर सुध्दा सहकार्य करत आहेत. ज्या माणसाच्या सोबत हा व्यवहार सुरू आहे तो माणुस माहितीच्या अधिकारासाठी कु विख्यात आहे. त्याने नांदेड जिल्ह्यातील सुर्याजी पिसाळ वृत्तीच्या अधिकाऱ्यांच्या साथीने अनेक शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांना, जनतेला, व्यापाऱ्यांना त्रास दिलेला आहे. जो माणुस कधीकाळी काळ्या पिवळ्या गाडीवर पाच-पाच रुपये जमा करत होता. त्या काळी तो पोलीस अंमलदारांना पाहुन पळून जात होता आता तो काही पोलीसांच्या वातानूकुलीत कक्षात बसून जुगार अड्डा चालविण्याची चर्चा करतो त्याला पोलीस मदत करतात.तो पोलीसांच्या मेहरबानीने मोठा झाल्याचे दाखवतो. अशा पोलीसांमुळेच लंकेची आठवण येते. ती अशी की, “घरका भेदी लंकाढाये’ अशामुळेच पोलीस खात्याचे नाव बदनाम होते. आणि हराम्यांना संधी मिळते. ते लोकांचे रक्त पितात.
स्थानिक गुन्हा शाखेत हा माणुस आला, तो डॉ. परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाणला बोलला हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसेल. त्या दिवशी माहिती अधिकार सोडून जुगार चालविण्याची चर्चा करण्यासाठी आलेला हा हरामी काळ्या टी शर्टमध्ये काळे काम करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेत आला होता. अशा या घाणेरड्यावृत्तीमुळेच स्थानिक गुन्हा शाखेचे नाव वाईट दृष्टीकोणातून घेतले जाते. काही दिवसांपुर्वीच परमेश्र्वर चव्हाण महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात गेले होते तेथून कोणता गुन्हेगार पकडला, काय ती कामगिरी होती याची पण काही माहिती उपलब्ध होत नाही. पण असे म्हणता येईल की, ते याच कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते काय? त्या जुगार अड्डयामध्ये या बोगस माहिती अधिकाऱ्याच्या कार्यकर्त्यासोबत अजून कोण-कोण भागिदार आहेत. याबद्दलची माहिती बिलोलीचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांनी घेतली पाहिजे आणि समाजाला त्रास देणाऱ्या या वृत्तीला ठेचून काढले पाहिजे. पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्या नेतृत्वात अर्चित चांडक यांनी हिंगोली जिल्ह्यातील एक मोठा जुगार अड्डा उध्वस्त केला होता ते अर्चित चांडक त्यांच्या उपविभागात हा जुगार अड्डा सुरू करू देतील काय याचे उत्तर काही दिवसांत मिळेल.
