नांदेड (प्रतिनिधी)-आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेच्या सुलभ अंमलबजावणी साठी करिता विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून विविध ठिकाणी पात्र लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड चे वाटप करण्यात येत आहे.
आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेची सुरुवात २३ सप्टेंबर २०१८ पासून संपूर्ण भारतात राबविण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ह्या दोन्ही योजना महाराष्ट्रात १ एप्रिल २०२० पासून एकत्रित रित्या राबविण्यात येत आहेत. आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत लाभार्थी हे सामाजिक आर्थिक जातीय जनगणना २०११ आधारित विशिष्ठ निकषांनुसार निवडलेले ठराविक निवडक लाभार्थी कुटुंब असून याचा लाभ कमाल मर्यादा ५ लाख रु प्रति कुटुंब प्रति वर्ष घेता येणार आहे. या साठी सामाजिक आर्थिक जातीय जनगणना २०११ आधारित विशिष्ठ निकषांनुसार निवडलेल्या ठराविक निवडक लाभार्थी कुटुंबाच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे नाव यादीत आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी www.mera.pmjay.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी अन्यथा १४५५५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा किंव्हा संलग्नीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांशी संपर्क साधावा. अधिक सोयी करिता ह्या योजने अंतर्गत नाव शोधण्यासाठी गाव निहाय तसेच वार्ड निहाय यादी पाहण्यासाठी www.aapkedwarayushman.pmjay.gov.in ह्या संकेत स्थळाला भेट द्यावी.
या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध गंभीर आजारांवर ३४ विशेष श्रेणीत उपचार असून त्या मध्ये १०३८ उपचार पद्धती या खाजगी रुग्णालयात तसेच १७१ उपचार हे शासकीय रुग्णालयांतर्गत योजनेच्या नियमानुसार उपलब्ध तज्ञ सुविधांवर पूर्णपणे मोफत उपचाराचा लाभ मिळेल. या मध्ये प्रामुख्याने सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, लहान मुलांचे कर्करोग, तसेच मानसिक आजारावरील उपचार आहेत. या योजनेचा लाभ नांदेड जिल्यातील जवळपास १२२०८३ कुटुंबांना होणार असून नांदेड जिल्ह्यात एकूण ५६१५८२ लाभार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ संपूर्ण भारतात मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्या करिता आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक आहे, ज्या कुटुंबाची नावे सामाजिक आर्थिक जातीय जनगणना २०११ आधारित विशिष्ठ निकषांनुसार निवडलेले ठराविक निवडक लाभार्थी कुटुंब मध्ये आहेत त्यांना हे आयुष्यमान कार्ड संलग्नीकृत रुग्णालयात जसे कि १) आधार हॉस्पिटल २) अपेक्षा हॉस्पिटल ३) तिरुमला हॉस्पिटल ४) लोटस हॉस्पिटल ५) नंदीग्राम हॉस्पिटल ६) मोनार्क हॉस्पिटल ७) रेनुकाई हॉस्पिटल ८) संजीवनी हॉस्पिटल ९) श्री गुरुजी रुग्णालय १०) श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल ११) विनायक हॉस्पिटल १२) लव्हेकर हॉस्पिटल १३) आढाव हॉस्पिटल १४) अष्टविनायक हॉस्पिटल १५) गायकवाड हॉस्पिटल, देगलूर १६) तुकामाई हॉस्पिटल १७) चिंतामणी हॉस्पिटल १८) गोदावरी हॉस्पिटल १९) उमरेकर हॉस्पिटल २०) नांदेड क्रिटीकल केअर २१) भक्ती हॉस्पिटल २२) आशीर्वाद हॉस्पिटल आणि सहयोग हॉस्पिटल, विष्णुपुरी इत्यादी खाजगी अंगीकृत रुग्णालय तसेच १) डॉ.शं.च.शा.वै.महाविद्यालय व रुग्णालय २) श्री.गु.गो.स्मा.जिल्हा सामान्य रुग्णालय ३) उपजिल्हा रुग्णालय मुखेड ४) उपजिल्हा रुग्णालय हदगाव ५) उपजिल्हा रुग्णालय देगलूर ६) उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा ७) ग्रामीण रुग्णालय कंधार ०८) ग्रामीण रुग्णालय भोकर ९) ग्रामीण रुग्णालय नायगांव १०) स्त्री रुग्णालय श्याम नगर इत्यादी शासकीय रुग्णालयात आरोग्यामित्रा मार्फत काढून दिले जातात तसेच आपल्या जवळील कॉमन सर्विस सेंटर, ग्रामपंचायत अंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र, यु.टी.आय.आय.टी.एस.एल. केंद्र येथे मोफत बनवून दिले जाते, या करिता सर्व लाभार्थ्यांनी मूळ शिधा पत्रिका व आधार कार्ड सोबत घेऊन वर दिलेल्या संलग्नीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांशी अथवा आपल्या जवळील कॉमन सर्विस सेंटर, ग्रामपंचायत अंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र, यु.टी.आय.आय.टी.एस.एल. केंद्र यांचेशी तात्काळ संपर्क साधावा व आयुष्यमान कार्ड बनवून घ्यावे असे आवाहन राज्य आरोग्य हमी सोसायटीचे जिल्हा समन्वयक डॉ दिपेशकुमार शर्मा यांनी केले आहे.