ताज्या बातम्या महाराष्ट्र

अवकाशातून रंगीत पॅरॉशुट खाली आले तर जनतेने याची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी ; उपकरणांना हाताळू नये; माहिती देणाऱ्यांना बक्षीस मिळणार

नांदेड(प्रतिनिधी)-1 नोव्हेंबर 2022 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत टाटा इन्स्टटुट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर हैद्राबाद या संस्थेकडून वैज्ञानिक संशोधनासाठी आवकाशात दहा बलुन फ्लॉईटस्‌ सोडण्यात येत आहेत. या बलूनमध्ये वेगवेगळी वैज्ञानिक उपक्रमे आहेत. ठरावीक कालावधीनंतर ती वैज्ञानिक उपक्रमे मोठ्या रंगित पॅराशुटसह महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी सांगली, सातारा, अहमदनगर, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली, नागपूर, जळगाव आणि सोलापूर या जिल्ह्यांच्या हद्दीमध्ये खाली येण्याची शक्यता आहे. नांदेडसह या सर्व जिल्ह्यातील जनतेने अशी उपकरणे दिसली तर त्या उपकरणांना स्पर्श करून नये किंवा कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये अशी उपकरणांने आढळली तर जवळचे पोलीस ठाणे, पोस्ट ऑफीस, स्थानिक प्रशासन किंवा जिल्हा प्रशासन यांच्याशी संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नांदेड येथील अनुराधा ढालकरी यांनी प्रेसनोट माध्यमातून जनतेला केले आहे.

अणू उर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने टाटा इन्स्टटुट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर हैद्राबाद येथून हे बलून अर्थात फुगे अवकाशात सोडले जाणार आहेत. हे फुगे 50 मिटर ते 85 मिटर व्यासाचे असतात. या फुग्यांमध्ये हायड्रोजन वायू भरलेला असतो.उपकरणांना वाहुन नेणारे फुगे 30 ते 42 किलो मिटर दरम्यान उंची गाठतील अशी अपेक्षा आहे. काही तासांच्या कालावधीनंतर या फुग्यांमध्ये असलेली उपकरणांने मोठ्या रंगीत पॅरॉशुटसह जमीनीवर खाली येतात. अंदाजे 20 ते 40 मिटर लांबीच्या एका दोरीवर लटकलेली उपकरणांने असलेले हे पॅरॉशुट साधारणपणे हळूहळू जमिनीवर येतात. ही उपक्रणे हैद्राबादपासून सुमारे 200 ते 350 किलोमीटर असलेल्या बिंदुवर उतरू शकतात. विशाखापटनम, हैद्रबाद, सोलापूर मार्गावर, आंध्र प्रदेश, उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातून हे फुगे वाहतील.

या उपकरणांमध्ये उच्च प्रकारचा दबाव असू शकतो. त्यामुळे ते उघडण्याचा प्रयत्न केला किंवा हाताळण्याचा प्रकार केला तर धोकादायक ठरू शकतात. ही उपकरणांने जमीनीवर आल्याची माहिती देणाऱ्यांना योग्य बक्षीस तसेच इतर खर्च देण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यात अशी उपकरणांने आढळली तर जनतेतील लोकांनी त्याबद्दलची माहिती जवळचे पोलीस ठाणे, पोस्ट ऑफीस, स्थानिक प्रशासन किंवा जिल्हा प्रशासन यांना द्यावी. जिल्हाधिकारी कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक 02462-2350747 अणि पोलीस नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक 02462-234720 यावर सुध्दा ही माहिती देता येईल असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *