नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर शहरातील देशपांडे गल्लीतील एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 10 हजारांचा ऐवज चोरला आहे. तसेच लोहा गावातून 30 लाख रुपये किंमतीची 10 टायरची हायवा गाडी चोरीला गेली आहे.
माधव विश्र्वनाथ गादगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 नोव्हेंबरच्या दुपारी 12 ते 2.30 या वेळेदरम्यान त्यांच्या साडूचा मुलगा आणि एका अनोळखी माणसाने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात स्टील डब्यामध्ये ठेवलेले 2 लाख 10 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला आहे. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक मोरे अधिक तपास करीत आहेत.
फेरोज खान मनसुर खान पठाण यांनी 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता लोहा येथील शनिमंदिरासमोर आपली 10 टायरची हायवा गाडी एम.एच.22 एएन 2451 उभी केली होती. ती गाडी 14 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेपर्यंत चोरीला गेली. या गाडीची किंमत 30 लाख रुपये आहे. लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक शेख अधिक तपास करीत आहेत.
