नांदेड(प्रतिनिधी)-भारताचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पुष्प अर्पण करून आपल्या अभिवादनाच्या भावना व्यक्त केल्या.
आज 14 नोव्हेंबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन देशभर बालदिवस म्हणून साजरा केला जातो. आज या प्रसंगाच्या दिवशी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, जिल्हा विशेष शाखेचे पेालीस निरिक्षक कुशे, नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरिक्षक करीम खान पठाण, बाबू मुंडे, पोलीस उपनिरिक्षक स्नेेहा पिंपरखेडे, प्रभारी जनसंपर्क अधिकारी उत्तम वाघमारे, स्थानिक गुन्हा शाखेचे दबंग पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि अनेक पोलीस अंमलदार उपस्थित होते. आपले अभिवादन व्यक्त करण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयातील अनेक मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यकांत कागणे, पोलीस अंमलदार संजय सांगवीकर आणि विनोद भंडारे यांनी केले होते.