नांदेड(प्रतिनिधी)-चोरट्यांनी गुरूद्वारा गेट नंबर 1 जवळील एक घरफोडून त्यातून 1 लाख 30 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.
सुरेंद्रसिंघ हरभजनसिंघ लांगरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे घर गुरूद्वारा गेट क्रमांक 1 जवळ आहे. दि.6 नोव्हेंबर रोजी रात्री 8 ते 9 नोव्हेंबरच्या रात्री 8 दरम्यान ते गुरूद्वारा बिदर साहिब येथे दर्शनासाठी सहकुटूंब केले होते. या संधीत कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या गॅलरीमधील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कपाटामधील तिजोरीचा भाग कट करून त्यात ठेवलेले दोन तोळे सोन्याचे दागिणे 1 लाख 25 हजार रुपये किंमतीचे आणि 5 हजार रुपये रोख रक्कम असा 1 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक भारतीय दंड संहितेच्या कलम 454, 457, 380 नुसार दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक माळी अधिक तपास करीत आहेत.
