नांदेड(प्रतिनिधी)-संत निरंकारी च्या 75 व्या मिटिंग ला होणाऱ्या प्रवाश्यांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड येथून पानिपत ला जाण्याकरिता नांदेड ते पानिपत दरम्यान नोवेंबर-2022 महिन्यात विशेष गाडीच्या 04 फेऱ्या करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे गाडी क्रमांक 07441 नांदेड ते पानिपत विशेष गाडी : गाडी संख्या 07441 हुजूर साहिब नांदेड ते पानिपत ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 15 आणि 22 नोवेंबर-2022 ला मंगळवारी सकाळी 08.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, सेलू, जालना, औरंगाबाद, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना , वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन, ग्वालियर, आग्रा, मथुरा, पळवल, न्यू दिल्ली, भोदावल माजरी मार्गे पानिपत येथे बुधवारी सायंकाळी 17.00 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 07442 पानिपत ते नांदेड विशेष गाडी: गाडी संख्या 07442 हि विशेष गाडी पानिपत येथून दिनांक 16 आणि 23 नोवेंबर-2022 ला बुधवारी रात्री 23.00 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गाने नांदेड येथे शुक्रवारी सकाळी 04.15 वाजता पोहोचेल. या गाडीत स्लीपर, वातानुकुलीत आणि जनरल असे 22 डब्बे असतील. गाडीचे थांबे आणि वेळापत्रक सोबत जोडले आहे. हि गाडी पानिपत ते नांदेड दरम्यान सुपरफास्ट एक्स्प्रेस बनून धावेल.
