नांदेड(प्रतिनिधी)- राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत पायी चालणारे कॉंगे्रस सेवा दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांना आज सकाळी वन्नाळी गावाजवळ हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.
आज सकाळी 8 वाजता राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा वन्नाळी गावापासून सुरू होणार होती. या यात्रेत एक दुर्देवी घटना घडली. कॉंगे्रस सेवा दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांच्याकडे या यात्रेदरम्यान झेंडा तुकडीचे संचलन होते. सकाळी 8 वाजता त्यांना श्वास घेण्यास त्रास होवू लागल्याने त्यांना वन्नाळी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण दुर्देवाने रुग्णालयात पोहचण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. नागपूरचे राहणारे कृष्णकुमार पांडे यांच्या दुर्देवी निधनाने कॉंग्रेस नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. यात जयराम रमेश, दिग्वीजयसिंह, लालजी देसाई, एच.के.पाटील, नाना पटोळे, अशोक चव्हाण आदींनी आपली श्रध्दासुमने कृष्णकुमार पांडे यांना अर्पण केली.
