109 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; भोकरला कोणी नाही
नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने 109 आयपीएस, महाराष्ट्र पोलीस सेवेतील अधिकारी आणि पोलीस उपअधिक्षकापासून अपर पोलीस अधिक्षक अशी पदोन्नती प्राप्त केलेल्या अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. परभणी येथील अविनाशकुमार यांना नांदेडचे अपर पोलीस अधिक्षक करण्यात आले आहे. हे आयपीएस अधिकारी आहेत. तसेच इतर अधिकाऱ्यांना सुध्दा नवीन पदस्थापना दिल्या आहेत. ज्यामध्ये भोकर येथील अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांना वर्धा जिल्ह्यात अपर पोलीस अधिक्षक म्हणून पाठविण्यात आले आहे. या आदेशामध्ये काही लोकांना पुन्हा प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे.
सहाय्यक पोलीस अधिकारी असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांंमधील अविनाशकुमार यांना नांदेडचे अपर पोलीस अधिक्षक करण्यात आले आहे. इतर आयपीएस अधिकारी पुढील प्रमाणे आहेत. अंचल दलाल अपर पोलीस अधिक्षक सांगली, निलेश तांबे-अपर पोलीस अधिक्षक मालेगाव, नाशिक ग्रामीण, कुमार चिंता-अपर पोलीस अधिक्षक गडचिरोली, यतीश देशमुख-अपर पोलीस अधिक्षक गडचिरोली या आदेशावर गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांची स्वाक्षरी आहे. नांदेडला अविनाशकुमार येणार आहेत. पण नांदेडचे अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांची बदली झाली आहे. पण त्यांना नवीन नियुक्तीसाठी प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे.
इतर 104 पोलीस अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या पुढील प्रमाणे आहेत. ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांना वर्धा जिल्ह्यात अपर पोलीस अधिक्षक पद देण्यात आले आहे. इतर पोलीस अधिकारी पुढील प्रमाणे आहेत. मंचक ज्ञानोबा इप्पर-पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेशन विभाग नाशिक, अभिनव दिलीपराव देशमुख-पोलीस उपआयुक्त मुंबई शहर, अनिल सुभाष पारसकर-पोलीस उपआयुक्त मुंबई शहर, एम.राजकुमार-पोलीस उपआयुक्त मुंबई शहर, अरविंद चावरीया-पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेशन पुणे, मनोज पाटील-पोलीस उपआयुक्त मुंबई शहर, प्रणय अशोक-समादेशक पोलीस बलगट क्रमांक 11 नवी मुंबई, अमोघ गावकर-पोलीस उपआयुक्त मुंबई शहर, मंजुनाथ शिंगे-सहाय्यक पोलीस महानिरिक्षक पोलीस महासंचालक कार्यालय, राकेश कलासागर-समादेश पोलीस बल गट क्रमांक 9 अमरावती, तेजस्वि सातपुते-पोलीस उपआयुक्त मुंबई शहर, गौरवसिंह -पोलीस उपआयुक्त मुंबई शहर, प्रविण मुंडे-पोलीस उपआयुक्त मुंबई शहर, मंगेश शिंदे-पोलीस उपआयुक्त मुंबई शहर, अजयकुमार बन्सल-पोलीस उपआयुक्त मुंबई शहर, मोहितकुमार गरग-पोलीस उपआयुक्त मुंबई शहर, भाग्यश्री नवटके-समादेश पोलीस बल गट क्रमांक 17 चंद्रपुर, संदीपसिंह गिल-पोलीस उपआयुक्त पुणे शहर, सुरेशकुमार मेंगडे-पोलीस उपआयुक्त मिराभाईंदर वसई इरार, पौर्णिमा गायकवाड-समादेशक पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली, यशवंत सोळंके-पोलीस अधिक्षक महामार्ग सुरक्षा पथक नागपूर, संदीप डोईफोडे- पोलीस उपआयुक्त मिराभाईंदर वसई इरार, किरण चव्हाण-पोलीस उपआयुक्त नाशिक शहर,गिता चव्हाण-उपआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग नाशिक, यशवंत काळे-अपर पोलीस अधिक्षक परभणी, अमोल झेंडे-पोलीस उपआयुक्त पुणे शहर, विजय मगर-पोलीस उपआयुक्त पुणे शहर.
या बदल्यांच्या यादीमध्ये प्रसाद अक्का नारु, श्वेता खेडकर, विजयकांत मंगेश सागर, प्रशांत विजयकुमार वाघुंडे, विशाल गायकवाड, अजित बोराडे, दत्ता किशन नलावडे, दत्तात्रय बापू कांबळे आणि ज्योती क्षिरसागर या अधिकाऱ्यांना पुन्हा प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या नवीन नियुक्तीचे आदेश नंतर काढण्यात येतील. तसेच नांदेडचे अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांना सुध्दा प्रतिक्षेत यादीत ठेवण्यात आले असून त्यांच्या बदलीचे आदेश नंतर काढण्यात येतील. वाचकांच्या सोयीसाठी हे दोन वेगवेगळे आदेश पीडीएफ फाईलमध्ये आम्ही बातमीत जोडले आहेत.
