नांदेड(प्रतिनिधी)-वसंतराव नाईक चौक येथे 30ऑक्टोबर रोजी मरण पावलेल्या एका 42 वर्षीय व्यक्तीच्या नातलगांना शोधण्यासाठी शिवाजीनगर पोलीसांनी जनतेला त्याची ओळख पटविण्यासाठी आवाहन केले आहे.
दि.30 ऑक्टोबर रोजी शहरातील वसंतराव नाईक चौक येथे एक 42 वर्षीय व्यक्ती बेशुध्द अवस्थेत सापडला. शिवाजीनगर पोलीसांनी त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले असतांना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. त्याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 279, 304 (अ), मोटार वाहन कायदा कलम 134(अ) (ब) नुसार गुन्हा क्रमांक 395/2022 दाखल झाला. याबाबतचा तपास पोलीस उपनिरिक्षक व्ही.आर.रोडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
या अनोळखी माणसाच्या नातलगांचा शोध घेण्यासाठी शिवाजीनगर पोलीसांनी शोध पत्रिका जारी केली आहे. या मयत 42 वर्षीय व्यक्तीचा रंग सावळा आहे, त्याने लालरंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेली आहे. त्यांचे केस बारीक असून काही काळे काही पांढरे आहेत. या वर्णनाच्या व्यक्तीबद्दल कोणास काही माहिती असेल तर ती माहिती शिवाजीनगरपोलीस ठाण्यात द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्कासाठी पोलीसांनी दुरध्वनी क्रमांक 02462-256520 आणि मोबाईल क्रमांक 9158807769 हे सुध्दा उपलब्ध करून दिले आहेत.