नांदेड ग्रामिण पोलीस उप विभागाच्या अर्चना पाटील आता अनुसूचित जाती जमाती आयोगात पोलीस अधिक्षक
नांदेड,(प्रतिनिधी)-राज्यातील 23 पोलीस उपाधीक्षकांना गृह मंत्रालयाच्यावतीने पदोन्नती देऊन त्यांना नवीन पदस्थापना देण्याचे आदेश जारी झाले आहेत. यात नांदेड ग्रामीण उपविभागाच्या पोलीस उप अधीक्षक अर्चना पाटील यांना पोलीस अधीक्षक पदावर पदोन्नती देऊन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई येथे नियुक्ती देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागाने आज जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील 23 पोलीस उप अधीक्षकांना पदोन्नती देऊन त्यांना नवीन जागी पदस्थापना देण्यात आली आहे. या आदेशावर गृह विभागाचे उपसचिव वेंकटेश भट यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.नांदेड जिल्ह्यातील नांदेड ग्रामीण पोलीस उपविभागाच्या पोलीस उप अधीक्षक अर्चना दत्तात्रय पाटील यांना मुंबईतील अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या कार्यालयात पोलिस अधीक्षक पदावर नवीन पदस्थापना देण्यात आली आहे.
इतर पदोन्नतीने नविन पदस्थापना प्राप्त पोलीस उप अधीक्षक पुढील प्रमाणे आहेत.जयंत नामदेव बजबळे यांना पोलीस उपायुक्त मीरा भाईंदर वसई विरार अशी पदस्थापना देण्यात आली आहे. पियुष विलास जगताप- अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, बाबुराव भाऊसाहेब महामुनी -अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा, अशोक तानाजी विरकर- स्वतंत्र आदेश निघणार आहेत, अश्विनी सयाजीराव पाटील – पोलीस उप आयुक्त नागपूर शहर, शीलवंत रघुनाथ नांदेडकर- पोलीस उपायुक्त औरंगाबाद शहर, प्रशांत अशोक सिंह परदेशी- पोलीस उपायुक्त मंत्रालय सुरक्षा मुंबई,प्रीती प्रकाश टिपरे -पोलीस उपायुक्त डायल 112 मुंबई,शेख समीर शेख नजीर -पोलीस महासंचालक कार्यालय,राहुल ज्ञानदेव मदने -नागपूर शहर, रीना यादवरावजी जनबंधू- अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर,अश्विनी परमानंद पाटील- पोलीस उप आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई, अमोल विलास गायकवाड- समादेशक भारत राखीव बटालियन क्रमांक 2 गोंदिया, कल्पना माणिकराव भराडे- प्राचार्य अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्र नागपूर,ईश्वर मोहन कातकडे- अपर पोलीस अधीक्षक भंडारा,प्रीतम विकास यावलकर -पोलीस अधीक्षक सायबर सुरक्षा,दत्ता लक्ष्मण तोटेवाड -अपर पोलीस महासंचालकांचे कक्ष अधिकारी, शितल सुरेश झगडे -राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई,नवनाथ ठकाजी ढवळे -पोलीस उपायुक्त ठाणे शहर, रत्नाकर एजिनाथ नवले -राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई, सागर रतनकुमार कवडे- पोलीस अधीक्षक दहशतवाद विरोधी पथक मुंबई.
गृह मंत्रालयाने 23 पोलीस उप अधीक्षकांना पदोन्नतीने दिलेल्या नवीन पदस्थापनांच्या आदेशाची पीडीएफ फाईल बातमी सोबत जोडली आहे.