नांदेड(प्रतिनिधी)-कंधार तालुक्यातील हिप्परगा गावचे सैनिक सुभेदार मेजर माधव वैजनाथ जायभाये यांनी 28 वर्ष 2 महिने सेवा करून 31 ऑक्टोबर रोजी ते सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले. उद्या दि.2 नोव्हेंबर रोजी नांदेडला येणाऱ्या संचखंड एक्सप्रेसने ते नांदेडला येणार आहेत.
हिप्परगाव ता.कंधार गावातील शेतकरी पुत्र माधव वैजनाथ जायभाये यांनी 26 ऑगस्ट 1994 रोजी सैन्य दलात आपली जागा निश्चित केली. सैन्य दलातील नियमावलीप्रमाणे दि.31 ऑक्टोबर 2022 रोजी भारतीय खलसेनेतून त्यांना सेवानिवृत्ती प्राप्त झाली. आपल्या सैन्य दलाच्या सेवेत सुभेदार मेजर माधव जायभाये यांनी 28 वर्ष 2 महिने देशाच्या सेवेसाठी अर्पण केले. सैन्य दलात भरती झाल्यानंतर सेवानिवृत्तीपर्यंत सुभेदार मेजर अशा पदोन्नत्या प्राप्त केल्या. सैन्य दलातील विविध 7 विविध सेवामेडल त्यांच्या छातीवर झळकतात तेंव्हा नांदेड जिल्ह्याच्या भुमिपूत्राचा अभिमान वाटतो. दक्षीण सैन्य गटातील नागपूर येथून त्यांना सेवानिवृत्ती मिळाली. सुरूवातीला पुढे, पटियाला पंजाब, अहमदाबाद गुजरात, उदमपुर, जम्मू काश्मिर, त्यानंतर लखनौ, खडकपूर, पश्चिम बंगाल, तेलंगणा राज्यातील हैद्राबाद, मध्यप्रदेशातील जबलपुर अणि सर्वात अंतिम नियुक्ती सन 2020 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत त्यांनी महाराष्ट्राच्या नागपुर येथे आपल्या सेवा प्रदान केल्या.
सेवानिवृत्तीनंतर उद्या दि.2 नोव्हेंबर रोजी सचखंड एक्सप्रेसने त्यांचे नांदेडला आगमन होणार आहे. नांदेडच्या या भुमिपुत्राने सैन्य दलात सुभेदार मेजर या पदापर्यंत पदोन्नती प्राप्त करून जिल्ह्याचे नाव देशसेवा करणाऱ्यांच्या यादीत आणले आहे. त्यांचे करावे तेवढे अभिनंदन कमीच आहे.
