नांदेड,(प्रतिनिधी)-अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहीती काढुन त्यांचेविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी पथके तयार केली होती.
दिनांक 31 आॅक्टोबर 2022 रोजी व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड यांना नांदेड शहरातील तानाजीनगर येथे दोन इसम स्वत:चे जवळ पिस्टल बाळगुन असल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन त्यांचे आदेशाने स्थागुशाचे अधिकारी व अमंलदार तानाजीनगर, नांदेड येथे रवाना केले. स्थागुशा चे अधिकारी व अमंलदार यांनी आकाश लुळे यांचे घरासमोरील रोडवर, तानाजीनगर, नांदेड येथे जावुन आरोपी नामे 1) आकाश गोविंदराव लुळे वय 20 वर्षे व्यवसाय बेकार रा. तानाजीनगर, नांदेड 2 ) राम व्यंकटी पल्लेवाड वय 23 वर्ष व्यवसाय बेकार रा. देगांव ता. नायगांव जि नांदेड यांना पकडुन त्यांची झडती घेतली असता त्यांचे कमरेला लावलेले एक एक पिस्टल व एक-एक जिवंत काडतुस मिळुन आले. सदरचे दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुस किंमती 40,800 /- रुपयाचे दोन पंचासमक्ष जप करुन सपोनि / पी. व्ही. माने यांच्या फिर्यादीवरुन पो स्टे विमानतळ येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, व्दारकादास , चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक गोविंदराव मुंडे, पोलीस अंमलदार मारोती तेलंग, सखाराम नवघरे, विठल शेळके, राजु सिटीकर, दिपक ओढणे, महेश बडगु यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.