नांदेड(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्यावतीने सेव्ह और शुट अशा पध्दतीचे सुरू असलेले घाणेरडे राजकारण हा अत्यंत दुर्देवी प्रकार असल्याची खंत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली.
आज त्या महाप्रबोधन यात्रेदरम्यान महाराष्ट्रात फिरत असतांना नांदेडला आल्या होत्या. तेंव्हा त्या पत्रकारांशी बोलत होत्या. याप्रसंगी त्यांच्यासोबत दत्ता पाटील कोकाटे, माधव पावडे, सुरेश पावडे, महेश खेडकर, डॉ.मनोज भंडारी, निकिता चव्हाण, वच्छला पुयड, दशरथ लोहबंदे आदी नेते उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलतांना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, आशीष शेलार, किरीट सोमय्या यांनी केलेल्या कांही शब्द छळासाठी मला आज त्यांना उत्तर देणे आवश्यक आहे. मला यायला उशीर झाला याची खंत व्यक्त करतांना त्यांनी नांदेडच्या नेत्यांना गुळगुळीत रस्ते तयार केल्याबद्दल धन्यवाद दिले. महाप्रबोधन यात्रेदरम्यान माझ्यावर आणि खासदार राजन विचारेवर दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल बोलतांना आम्ही मरण पत्कारु पण शरण पत्कारणार नाही असे सांगितले. आशीष शेलारबद्दल बोलतांना मराठी मुस्लमान या शब्दाचे पोस्टमार्टम करत त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की, हिंदुत्व कशाशी खातात हे माहित आहे का? किरट सोमय्या बद्दल वेगवेगळे भ्रष्टाचाराचे त्यांचे वक्तव्य सांगत त्यांनी प्रश्न विचारला की, तुमच्यात दम असेल तर सर्वोच्च न्यायालयाने आदेश केलेला बेकायदेशीर नारायण राणेचा बंगला पाडून दाखवा. 531 कोटी रुपये शेतकरी विमा देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सुध्दा विमा कंपन्या त्यात पैसे भरत नाहीत.दसरा मेळाव्यासाठी 1400 बस कशा बुक झाल्या, मेळाव्याचा खर्च कोणी केला हे पण सांगा. महाराष्ट्रातून 7 मोठे उद्योग महाराष्ट्र बाहेर गेले म्हणजे महाराष्ट्रातील युवकांना काम मिळू नये यापेक्षा दुसरी भावना काय असेल.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटात गेलेले मिंधे यांच्यावर या सरकारची जी भिस्त सुरू आहे ती खुप लांब चालणार नाही. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे घराबाहेर पडत नव्हते असा आरोप करणाऱ्या या मिंध्या गटाने एकनाथ शिंदे पितृपक्ष जेवायला फिरतात याला पण आठवण ठेवावे. ते कधी मंत्रालयात बसतात. आता मुंबईच्या महापौर किशोर पेंडणेकर विरुध्द यांच्याबद्दल भारतीय जनता पार्टी अत्यंत खालच्या पातळीवर, कौटुंबिकस्तरावर बोलून आपलेच हसू करून घेत आहे. त्यामुळे त्यांच्यातील हलकट राजकारणाची पध्दती दिसते.
मिंध्या गटातील सर्वांविरुध्द नोटीसा पाठवून त्यांना आमच्याकडे या असेच सांगण्यात आले आणि त्यांच्याविरुध्द सुरू करण्यात आलेली सर्व कार्यवाही बंद करण्यात आली. यामध्ये काय सत्य आहे हे पुन्हा एकदा दिसायला लागले आहे आणि याचे उत्तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमच्यापेक्षा जास्त चांगले उत्तर जनता देईल असे सुषमा अंधारे म्हणाल्या.