नांदेड(प्रतिनिधी)-मातुळ ता.भोकर येथील महिला ग्रामसेवकांना एका व्यक्तीने माहिती अधिकार या कायदाचा वापर करून खंडणी मागितली. त्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून 10 हजार रुपये पण दिले. या संदर्भाने आता मातुळ येथील त्या खंडणीखोराविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
मातुळ ता.भोकर येथील ग्रामसेविका माधवी मनोहर जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या मातुळ गावात एक वर्षापासुन ग्रामसेवक पदावर कार्यरत आहेत. त्याच गावातील अमृता आनंद जाधव या व्यक्तीने त्यांना त्रास देण्यासाठी माहिती अधिकार कायदा अनेक वेळेस दुरउपयोग करून अनेक अर्ज दिले. अर्ज परत घेण्यासाठी अनेकवेळस खंडणी मागितली. त्याने 50 हजार रुपये खंडणी मागितली. या संदर्भाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. या त्रासाला कंटाळून माधवी जाधव यांनी या खंडणीखोराला 10 हजार रुपये दिले पण त्याची मागणी 50 हजार रुपये होती. दि.25 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता आणि 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मातुळ ग्राम पंचायतमध्ये येवून अमृता जाधवने त्यांच्या टेबलावर खुर्ची अपटली. तु बाहेर कशी जातेेस असे सांगत माधवी जाधव यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ केली, तुझ्यावर ऍट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिली. तुझ्याविरुध्द उपोषणाला बसतो ही धमकी पण दिली. तुला वारंवार माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागून त्रास देतो, तु कशी काम करतेस पाहतो असे अमृता आनंद जाधव म्हणाला. भोकर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 407/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 384, 385 आणि 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक दिगंबर पाटील अधिक तपास करीत आहेत.
