ताज्या बातम्या नांदेड

जिल्ह्यातील 2263 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

▪️4 लाख 19 हजार 183 पशुधनाचे लसीकरण

नांदेड (प्रतिनिधी)- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 179 बाधित गावात 2 हजार 263 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे. आजवर 101 पशुधन मृत्यूमुखी पडले आहेत. प्रशासनाने बाधित गावासह पाच किमी परिघातील इतर 1050 गावांवर लक्ष दिले असून लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 19 हजार 183 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 31 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *