नांदेड(प्रतिनिधी)-वारंवार तक्रार करूनही मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव, महसुल आयुक्त हे भ्रष्ट आयुक्त, भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट नगरसेवक व बोगस पत्रकारांवर कार्यवाही करत नाहीत उपायुक्त नगर परिषद देखील पत्र पाठवत आहे तरी त्यावर काही कार्यवाही होत नाही याला आता नगर परिषद प्रशासनातील महिला अधिकारी सुध्दा कंटाळले आहेत.
नांदेड येथील महानगरपालिकेत नोकरीस असलेले आणि नंतर त्यांच्यावर दबाव आणून त्यांना नोकरीपासून राजीनामा देण्यास भाग पाडलेले श्रीकृष्ण निळकंठराव झाकडे यांनी पुन्हा एकदा सप्टेंबर 2022 महिन्यात 11 वा तक्रारी अर्ज नगर परिषद प्रशासन शाखा विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्याकडे दिला.त्यात हुतात्मा दिन, 21 ऑक्टोबर 2022 पासून महसुल आयुक्त कार्यालय औरंगाबाद समक्ष धरणे आंदोलन करणार असल्याचे या अर्जात लिहिले आहे. या अगोदर श्रीकृष्ण झाकडे यांनी दिलेल्या 10 अर्जांचा संदर्भ सुध्दा ऍलीस पोरे यांनी अवर सचिव नगर विकास विभाग मुंबई यांना लिहिलेल्या पत्रात नमुद आहे.
श्रीकृष्ण झाकडे यांनी 13 जून 2022 रोजी पहिला अर्ज दिला होता. आजपर्यंत त्यांनी 11 अर्ज दिले आहेत. त्यामध्ये नांदेड वाघाळा महानगरपालिका येथील अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, व्यावसायीक राजकीय नेते व बोगस पत्रकार या सर्वांनी मिळून अनेक भुखंड घोटाळे करून भ्रष्टाचार केला आहे.अनियमित कामे करून महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान केले आहे असे अनेक आशय श्रीकृष्ण झाकडे यांच्या 11 तक्रारींमध्ये आहेत.
महसुल आयुक्त कार्यालयात प्राप्त झालेल्या श्रीकृष्ण झाकडे यांच्या पत्राला अनुसरुन नगर परिषद प्रशासन विभागाच्या उपायुक्त ऍलीस पोरे यांनी अवर सचिव नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांना पत्र पाठविले आहे. त्या पत्रात हे प्रकरण आपल्या अखत्यारीतील आहे. महानगरपालिका नांदेड आपल्या कार्यालयाशी संंबंधीत आहे. म्हणून महसुल आयुक्त कार्यालयाचा या प्रकरणाशी काही संबंध येत नाही म्हणून आपल्या स्तरावरून श्रीकृष्ण झाकडे यांनी दिलेल्या अर्जावर कार्यवाही करावी अशी विनंती केली आहे. श्रीकृष्ण झाकडे यांनी केलेला हा आपल्या अर्जांचा पाठपुरावा पाहता लोकशाहीमध्ये त्यांच्या 11 अर्जांवर काही कार्यवाही झाली नाही ही बाब लोकशाहीसाठी दुर्देवीच आहे.
