नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी झाली असून तेथून 38 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. तसेच किवळा ते उस्माननगर जाणाऱ्या रस्त्यावरील काही दुकानांचे शटर तोडून चोरट्यांनी 72 हजार रुपये किंमतीचे धान्य चोरून नेले आहे. तसेच किनवट तालुक्यातील कोठारी शिवारातून चोरट्यांनी 10 हजार रुपये किंमतीची एक विद्युत मोटार चोरून नेली आहे.
श्रीरंग संभाजी पाईकराव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 ऑक्टोबरच्या सकाळी 7 ते 7.30 या वेळेदरम्यान गंगा कॉलनी तरोडा (बु) येथून त्यांच्या घराच्या मेनगेट काढून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि पलंगाखाली अडकवलेल्या बॅगमधील सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 38 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
सुदर्शन किशनराव लोंढे रा.लोंढेसांगवी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 ऑक्टोबरच्या सायंकाळी 5.30 ते 26 ऑक्टोबरच्या सकाळी 5.30 वाजेदरम्यान किवळा ते उस्माननगर जाणाऱ्या रस्त्यावर वडगाव फाट्याजवळ गट क्रमांक 114 मध्ये असलेल्या काही दुकानांचे शटर चोरट्यांनी तोडले आणि त्यातून सोयाबीन पोते 24 क्विंटल वजनाचे किंमत 72 हजार रुपये असा ऐवज चोरुन नेला आहे. सोनखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार नागरगोजे अधिक तपास करीत आहेत.
प्रफुल्ल शामराव इंगोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे कोठारी ता.किनवट शिवारातून 24 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6 ते 25 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6 वाजेदरम्यान त्यांच्या शेतातील 10 हजार रुपये किंमतीची विद्युत मोटार कोणी तरी चोरुन नेली आहे. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कल्लाळे अधिक तपास करीत आहेत.
