लोहा,(प्रतिनिधी)- शहरातील शिवकल्याण नगर भागात एक घर सोडून चोरट्यांनी 6 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
वसंत व्यंकटराव कळसकर हे पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त व्यक्ती लोहा शहरातील शिवकल्याण नगर भागात राहतात. दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 2. 40 वेळे दरम्यान कोणीतरी चोरट्यांनी त्यांचे घर फोडून कपाटातून सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 6 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
लोहा येथील पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मारुती सोनकांबळे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे. पोलिसांनी त्वरित प्रभावाने गुन्हेगार शोध घेणाऱ्या श्वानपथकाला बोलावले.पण काय प्रगती झाली हे समजू शकले नाही.