नांदेड(प्रतिनिधी)-मुंबईच्या तीन व्यापाऱ्यांनी नांदेड येथून खरेदी केलेल्या हळद कुंड या शेती मालाचे 12 लाख 98 हजार 122 रुपये न देवून फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विश्र्वनाथ निवृत्ती भांडेगावकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुंबई येथील उन्नती ट्रेडर्सचे मालक रितेश लिंगय्या घोडेकर, नरेश कांतीलाल जैन आणि नितीन प्रकाश पारटे यांनी त्यांच्याकडून लाखो रुपयांचे हळद कुंड खरेदी केले. त्यासाठी झालेल्या एकूण किंमतीतील 24 लाख रुपये दिले परंतू 12 लाख 98 हजार 122 रुपये आजपर्यंत दिले नाहीत.या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 389/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गायकवाड यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.
