नांदेड(प्रतिनिधी)-दिर आणि भावजयीच्या त्रासाला कंटाळून मोठ्या जाऊने केलेल्या आत्महत्या प्रकरणी दिर आणि त्याच्या पत्नीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शारदा भवन हायस्कुलच्या पाठीमागे राहणारे शितलसिंह हनुमानसिंह ठाकूर यंानी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची बहिण काजलबाई मनोजसिंह ठाकूर (32) रा.लोहारगल्ली नांदेड यांचा दिर विनोद प्रेमसिंह ठाकूर आणि त्यांची पत्नी मेघाबाई विनोदसिंह ठाकूर हे दोघे काजलबाईला लेकरांच्या भांडणावरुन नेहमी त्रास देत असत. त्यांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून काजलबाईने 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेच्यासुमारास आपल्या घरात नॉयलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला. त्यांच्यावर 19 ऑक्टोबरपर्यंत उपचार सुरू होता.29 ऑक्टोबर रोजी त्यांचा जिव गेला. इतवारा पेालीसांनी याप्रकरणी विनोद ठाकूर आणि त्यांची पत्नी मेघाबाई ठाकूर विरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 306, 504 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 287/2022 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड हे करणार आहेत.
