नांदेड(प्रतिनिधी)- न्यायालयात उलट तपासणीच्या अधिकाराचा वापर करून नांदेडमधील दुसऱ्या पिढीचे वकील ऍड. मनिष रामेश्र्वर शर्मा(खांडील) यांनी विनाकारण अभिलेख तयार करण्याची एक नवीन पध्दत सुरू केली आहे.
दि.11 ऑक्टोबर 2022 रोजी नांदेडच्या मुख्य न्यायदंडाधिकारी कार्यालयात ऍड.निखिल कैलास शर्मा यांची आरसीसी क्रमांक 536/2021 मध्ये साक्ष होती. या प्रकरणात कुशल तोष्णीवालला 22 फेबु्रवारी 2021 रोजी ऍड.निखील शर्मा यांच्या घरासमोर त्यांचे काका शाम ताष्णीवाल आणि त्यांचा मुलगा यश या दोघांनी मारहाण केली होती. त्यावेळी ऍड.निखील शर्मानेच जखमी झालेल्या कुशल तोष्णीवालला दवाखान्यात नेवून त्याच्यावर उपचार करायला लावले होते. त्यानंतर कुशल तोष्णीवालने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आणि त्यात तो खटला न्यायालयात आल्यावर त्याचा क्रमांक आरसीसी 536/2021 झाला. ऍड. निखील शर्मा यांची साक्ष न्यायालयाने निशाणी क्रमांक 42 वर नोंदवलेली आहे. आपल्या सर तपासणीत ऍड. निखील शर्मा यांनी घडलेला प्रकार न्यायालयासमक्ष सांगितला.
त्यानंतर बारी होती ऍड. मनिष रामेश्र्वर शर्मा (खांडील) यांची उलट तपासणी घेतांना तोष्णीवाल बंधूंच्या भांडणापेक्षा जास्त प्रश्न ऍड. निखील शर्माविरुध्द बार्शी जि.सोलापूर येथे दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 165/2022 चे प्रश्न जास्त विचारले. निशाणी क्रमांक 42 नांदेडच्या काही नामांकित वकीलांना दाखवली तेंव्हा हा विनाकारण अभिलेख तयार करण्याचा चुकीचा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.
या उलट तपासणीमध्ये वास्तव न्युज लाईव्हमध्ये फक्त ऍड. निखील शर्मा आणि ऍड. मनिष रामेश्र्वर खांडील यांच्या बातम्या लिहुन दिल्यानंतर वास्तव न्युज लाईव्हने त्यांना प्रसिध्दी दिली होती. त्या बातम्यांवर रामप्रसाद खंडेलवाल यांचे नाव लिहिलेले आहे. त्या संदर्भाचा प्रश्न विचारतांना रामप्रसाद खंडेलवालने ती बातमी न्युज चॅनेलवर टाकली असा प्रश्न होता. या संदर्भाने वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने खुलासा लिहिला जात आहे की, फक्त त्या बातम्या त्यांनी लिहिल्या होत्या. बाकी इतर बातम्यांशी किंवा वास्तव न्युज लाईव्हशी रामप्रसाद खंडेलवाल यांचा काही एक संबंध नाही. बार्शीच्या ज्या गुन्ह्या संदर्भाने बार्शी जिल्ह्याच्या वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या होत्या त्या बातम्यांमध्ये त्या गुन्ह्यातील पिडीत महिलेचे नाव सुध्दा लिहिलेले होते याबद्दल मात्र मनिष खांडील यांना आपल्या हातानेच आपण मदत करणाऱ्या महिलेची बेअबु्र होत आहे हे लक्षात आले नाही. निशाणी क्रमांक 42 ची माहिती मिळाल्यानंतर वास्तव न्युज लाईव्हने रामप्रसाद खंडेवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी बार्शी येथे ऍड. निखील शर्मा यांचा रिमांड आणि जामीनपर्यंत हजर होतो. हा प्रश्न जरी ऍड. मनिष रामेश्र्वर शर्मा (खांडील) यांनी विचारला तरी मी माझ्या लेकरांविरुध्द दाखल झालेल्या गुन्ह्यातून त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी तेथे गेलो होतो यात काही चुक नाही. ऍड. मनिष शर्मा तर पैसे घेवून आरोपीच्या रिमांड आणि जामीनीच्या वेळेस हजर राहतात त्यांचा तो धंदा आहे. ऍड. मनिष रामेश्र्वर शर्मा खांडीलने निखीलला जामीन मिळू नये म्हणून बार्शी न्यायालयात आपले शपथपत्र सुध्दा दिले होते, पण बार्शी न्यायालयाने त्या शपथपत्राला निशाणी क्रमांक सुध्दा दिलेला नाही अशीच असते काय वकीली असा प्रश्न रामप्रसाद खंडेलवाल यांनी उपस्थित केला.
भाग्यनगर पोलीस ठाण्यात ऍड. मनिष शर्मा मदत करणाऱ्या महिलेविरुध्द गुन्हा क्रमांक 288/2022 दाखल झाला आहे. त्यात तक्रारदार महिलेने दुसऱ्यांदा दिलेल्या अर्जात ऍड.मनिष रामेश्र्वर शर्मा (खांडील)चे नाव आहे. रामप्रसाद खंडेलवाल सांगत होते की, जेंव्हा मी बार्शीला गेलो होतो त्यावेळी न्यायालय परिसरातील माझे फोटो याच ऍड. मनिष खांडीलने व्हायरल करून माझी बदनामी केली होती. त्यानंतर ऍड. मनिष रामेश्र्वर शर्मा (खांडील) हा वकील ऍड. निखील शर्माला न्यायालयीन प्रक्रियेत जास्ती जास्त त्रास द्यावा यासाठी बार्शी न्यायालयात हजर होतो. त्याचे फोटो सुध्दा रामप्रसाद खंडेलवाल यांच्याकडे आहेत. आरसीसी क्रमांक 536 मध्ये विचारलेले अनेक प्रश्न ऍड.निखील शर्मा, त्यांचे बंधू निहाल शर्मा यांच्याशी सुध्दा संबंधीत आहेत. त्यांच्याच घरात भाड्याने राहिलेल्या ऍड. मनिष रामेश्र्वर शर्मा (खांडील) यांनी हा नांदेडच्या न्यायालयात आणलेला अभिलेख करण्याचा नवीन प्रकार दुर्देवी असल्याचे अनेक वकीलांचे सांगणे आहे.