मुंबई- माझ्या तुटपुंज्या वाचनावरून एक गोष्ट समजली की सत्ता(power)ही माणसाची अंतिम प्रेरणा असते तशी सैद्धांतिक मांडणी’ फ्रेडरिक नीचे’ या तत्त्वज्ञाने केली आहे . त्याच विचारसरणीची मोडतोड करून हिटलरच्या विचाराचा उदय झाला. ही सत्ता राजपुत्रांनी कशी मिळवायची आणि टिकवायची याबद्दल पंधराव्या शतकातील ‘निकोलाव मक्की वेली’ याने द प्रिन्स या पुस्तकात काही मार्ग सांगितलेत. ते जगभरचे सत्तापीपासू आजही वापरतात.
” राजपुत्रांनो तुम्हाला सत्ता हवी असेल तर तुम्ही सर्व गुण संपन्न असला पाहिजे. परंतु एका माणसामध्ये सर्व गुण असणे शक्य नाही. तरीही फिकीर करू नका. सदगुण नसले तरी ते आहेत असे दाखवा / ढोंग करा. आणि हो निव्वळ माणसाचे गुण सत्ता मिळवण्यासाठी पुरेसे नाहीत त्यासाठी प्राण्यांचे गुण अंगी बाणावे लागतील . विरोधकांचा काटा काढण्यासाठी सिंहासारखे क्रूर बना! निव्वळ सिंह बनणे पुरेसे नाही. आपल्या विरोधकांनी लावलेले सापळे ओळखण्यासाठी कोल्हा सारखे धूर्त बना.
अंधेरी मतदार संघात सिंहाचे सुळे वाकडे झाले व कोल्ह्याच्या जिभेची चव गेली. हिटलर ची कॉपी केलेली संस्कृती फार उपयोगाला आली महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीला एक नवी म्हण मिळाली.
कोल्ह्याला संत्री आंबट!
इतक्या वर्षानंतर महाराष्ट्रात नवनिर्माण झाले.
एका छोट्या पत्रामुळे महाराष्ट्राला भारतीय संस्कृतीची नव्याने ओळख झाली!
कारल्याला गोड आणि संत्री ला आंबट म्हणणाऱ्या कोल्ह्यांना लोक आता ओळखू लागलेत ही मोठी जमेची बाजू आहे!
– सुरेश खोपडे , सेवा निवृत्त आयपीएस अधिकारी