नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यवसायीकाची 80 हजार 736 रुपयांची फसवणूक होवून 8 महिने होत आले तरी अद्याप या तक्रारीवर काहीच झाले नाही असे अर्जदार व्यवसायीक भास्कर बलशेटवार सांगतात.
भास्कर वसंतराव बलशेटवार यांचे श्री गुरूनानक मार्केट येथे तन्मय ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. तेथे लहान मुलांच्या खेळणी विकण्याचा कारभार चालतो. फेसबुकवरील मॅनीफॅक्चरींग नावाच्या ऍपवरून ते नेहमी व्यवहार करतात. दि.12 फेबु्रवारी 2022 रोजी त्याच ऍपवर माधव मार्केटींग नावाच्या कंपनीची रबर आणि फुगे विकण्याची माहिती समजली. त्यावर असलेला फोन क्रमांक 9080466025 यावर फोन करून संबंधीत साहित्याची माहिती घेतली आणि त्यानंतर दि.13 फेबु्रवारी 2022 रोजी पुन्हा बोलेले आणि 14 फेबु्रवारी रोजी आरटीजीएसमार्फत माधव मार्केटींग तामिळनाडू यांच्या नावाने 43 हजार 200 रुपये पाठवले. त्यातून त्यांना रबर खरेदी करायचे होते. त्यानंतर पुन्हा फुगे खरेदी करण्यासाठी 16 फेब्रुवारी 2022 रोजी गुगलपेद्वारे कालुराम प्रजापतच्या नावाने त्या फोनवर 37 हजार 536 रुपये पाठवले.
20 फेबु्रवारी 2022 रोजीपासून कालूराम प्रजापत किंवा मोबाईल क्रमांक 9080466025 चा धारक त्यांचा फोन उचलत नव्हता म्हणून त्यांनी याबाबतची तक्रार सायबर पोलीस ठाणे यांच्या नावाने 26 फेबु्रवारी 2022 रोजी दिली. तो अर्ज सायबर पोलीस ठाण्याने वजिराबाद पोलीस ठाण्याकडे पाठवला. तो अर्ज स्टेशन डायरी क्रमांक 23 वेळ 17.16 दि.26 फेबु्रवारी 2022 रोजी नोंद करून पोलीस निरिक्षकांच्या आदेशाने तपासासाठी दिला.
याबद्दल भास्कर बलशेटवार यांनी सांगितले की, दखलपात्र गुन्ह्याची तक्राार असतांना तो अर्ज आजही चौकशीवर आहे असा चालतो वजिराबाद पोलीस ठाण्यातील कारभार.
