विदेश

अमेरिकेच्या डीएफसी सीईओ स्कॉट नॅथनची भारतातील भेट दशलक्ष डॉलरमध्ये कर्ज देणारी

नांदेड(प्रतिनिधी)-उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये नोकऱ्या निर्माण करण्यासाठी डीएफसी (युएस इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कार्पोरेशन)नेहमीच महिला उद्योजक आणि लहान व्यवसाय यांना वित्त पुरवठा करते. त्यासाठी उच्च मापदंडाचे पालन करत पर्यावरण, मानवी हक्क आणि कामगारांच्या हक्काचा आदर करतात. यासाठीच डीएफसीचे सीईओ स्कॉट नॅथन यांनी मुंबई येथे आले तेंव्हा भारत आणि इंडो पॅसिफीक प्रदेशातील धोरणात्मक सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालणा देणाऱ्या खाजगी क्षेत्रातील नेत्यांशी संवाद साधला. स्कॉट नॅथन यांनी खाजगी क्षेत्रातील कंपन्यांशी भेट घेतली. ज्या कंपन्या आरोग्य परिणामांमध्ये प्रगती करत आहेत, महिलांना आर्थिक प्रवेश प्रदान करत आहेत आणि हवामानास आर्थिक स्त्रोत चालविण्यासाठी नाविन्यपुर्ण उपाययोजना करीत आहेत. या क्षेत्रांवर नॅथन यांनी भर दिला.
अमेरिकेतून सीईओ स्कॉट नॅथन हे भारतात मुंबईला आले होते. त्यांनी अमेरीकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतातील नाविन्यपुर्ण प्रभाव, निधी, नवीन इक्वीटी आणि गुंतवणुकीच्या संधीबाबत जाणून घेतले. नॅथन यांनी इंडिया एक्सपोर्ट , बॅंक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचलक हर्षा यांची भेट घेतली. त्यात डीएफसी आणि बॅंक यांच्या भागिदारीसाठी चर्चा झाली. वर्तमान आणि भविष्यातील सहकारी कामांबाबत महत्वाची चर्चा करण्यात आली.
नॅथन यांनी फस्ट सोलर इंकचे भारतातील सुजय घोष यांची भेट घेतली. डीएफसीच्यावतीने फस्ट सोलरच्या मॉडील उत्पादनाबाबत तामिळनाडूमध्ये 3.3 गिगावॅट उत्पादनाचे समर्थन केले. यामुळे देशातील क्षेत्रामध्ये अक्षय उर्जा प्रकल्पांसाठी सौर उर्जा साखळीची विविधता तयार होईल. नॅथन यांनी डिएफचीच्यावतीने 35 दशलक्ष डॉलरचे कर्ज माध्यमांमध्ये आणतांना त्यावर औपाचारीक स्वाक्षरी कार्यक्रमांची भेट घेतली. डीएफसी मायक्रो फायनान्स फोर्ट फॉलीयोच्या विस्तारास समर्थन देईल. मायक्रो फायनान्स भारतातील जवळपास 4 दशलक्ष महिलांना सेवा देते. डीएफसीचे कर्ज गरज असलेल्या अतिरिक्त 5 दशलक्ष महिलांना ही भागिदारी पोहचविण्यासाठी काम करणारी डीएफसी ही पहिली संस्था आहे. औपाचारिक स्वाक्षरी कार्यक्रमास बायोगॅस पुरवठा करणारी कंपनी पंजाब रिन्युएबल एनर्जी सिस्टीम्स प्रा.लि. ला डीएफसीच्यावतीने 10 दशलक्ष डॉलर कर्जाची हमी हायलाईट करण्यात आली आहे. यामुळे भारताच्या वाढत्या उर्जा गरजा पुर्ण होण्यास मदत होईल. नॅथन यांनी यासोबत अनेक भारतीय कंपन्यांना भेट दिली. डीएफसी विकसनशिल जगासमोर सर्वात गंभीर आवाहनांना तोंड देण्यासाठी वित्त पुरवठा करते आणि खाजगी कंपन्यासोबत विकासात भागिदारी करते.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *