नांदेड (प्रतिनिधी)- भोकर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे हे आजारी झाल्याने तशी नोंद करून ते उपचारासाठी गेले आहेत. आज पोलीस विभागातील जवळपास 200 पेक्षा जास्त अंमलदारांना त्यांच्या समुपदेशानंतर बदली करण्यासाठी पोलीस मुख्यालयात बोलाविण्यात आले आहे. विजय कबाडे नसल्यामुळे या कामात उशीर होत आहे.
भोकरचे अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांची तब्येत अचानकपणे बिघडल्याने ते आजारासाठी उपचार करण्यासाठी कोणत्या तरी बाहेरगावाच्या मोठ्या रूग्णालयात गेले आहेत, अशी माहिती सांगण्यात आली आहे. आज जवळपास 200पेक्षा जास्त पोलीस अंमलदारांना त्यांच्या बदल्या करण्यासाठी पोलीस मुख्यालयात बोलाविण्यात आले आहे. वृत्त लिहीपर्यंत बदलीची प्रक्रिया सुरू झाली नव्हती. त्याठिकाणी सकाळपासून हजर असलेल्या पोलीस अंमलदारांनी सांगितले की, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे मुख्यालयात आलेले आहेत, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे येणार आहेत आणि अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे हजर नसल्यामुळे अडचणी येत आहेत. पण बहुदा असे सांगणाऱ्या पोलीस अंमलदारांना हे माहित नसेल की, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आजारी आहेत आणि ते उपचारासाठी कोणत्या तरी दुसऱ्या जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या राजधानीत उपचारासाठी गेले आहेत. मुंबईमध्ये बऱ्याच आजारांचा उपचार ‘दगडी चाळीत’ होतो. उपचार कोणत्या पद्धतीचा आहे याची माहिती मात्र प्राप्त करता आली नाही.