नांदेड,(प्रतिनिधी)- राज्य सरकाने सन २०१८,२०१९ आणि २०२० च्या भारतीय पोलीस सेवेतील ११ अधिकरऱ्यांना सहायक पोलीस अधीक्षक पदावर नियुक्त्या दिल्या आहेत.यात नांदेड जिल्ह्यातील भोकर उप विभागात महिला आयपीएस अधिकारी शफकत आमना यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
राज्यातील गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट्ट यांनी जरी केलेल्या आदेशानुसार सन २०१८,२०१९ आणि २०२० या वर्षात भारतीय पोलीस सेवेत आलेल्या ११ अधिकाऱ्यांना सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर पहिल्या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.या नियुक्त्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील भोकर उप विभागात महिला आयपीएस अधिकारी शफकत आमना यांना नियुक्ती मिळाली आहे.या पूर्वी नांदेड जिल्ह्यात निर्मला अर्जुन आणि त्यानंतर विनिता साहू यांनी काम केलेलं आहे.
राज्यातील पूर्वी चंपारण भागातील शफकत आमना यांनी आपल्या भागात बंदुका गरजताना पहिल्या आहेत शिक्षक पदावरुन सेवा निवृत्त झालेलय मोहंमद ज़फ़ीर आलम यांच्या मार्गदर्शनात शफकत आमना यांनी आपलं शिक्षण पूर्ण केले.भूगोल या ऐच्छिक विषय घेऊन त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आहे. त्यांच्या कुटुंबातील बहिणी आणि बंधू सुद्धा उच्च शिक्षित आहेत.त्यांना पहिली नियुक्ती नांदेड जिल्यातील भोकर उप विभागात मिळाली आहे.
इतर आयपीएस अधिकारी आणि त्यांना मिलेल्या नियुक्त्या पुढील प्रमाणे आहेत.तेगबीरसिंघ संधू (२०१८) मालेगाव शहर जि नासिक,धीराज कुमार बच्चू (२०१९) माजलगाव जि.बीड,अभयसिंह बाळासाहेब भोसले (२०२०),गोकुळ राज जी (२०२०) बाळापूर जि अकोला,आशित नामदेव कांबळे (२०२०) रामटेक जि.नागपूर ग्रामीण,श्रीमती महेक स्वामी (२०२०) वैजापूर जि.औरंगाबाद,श्रीमती नितीपुडी रश्मिता राव (२०२०) तुमसर जि,भंडारा, पंकज अतुलकर (२०२०) पुसद जि.यवतमाळ,सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी (२०२०) धुळे शहर,एम.वी.सत्यसाई (२०२०) लोणावळा जि.पुणे ग्रामीण