नांदेड(प्रतिनिधी)-वर्ताळा ता.मुखेड येथे 1 लाख 15 हजार रुपये किंमतीचे दोन पशुधन चोरीला गेले आहेत. बसस्थानकातून 27 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
वर्ताळा ता.मुखेड येथील एकनाथ विठ्ठल डावखुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.9 ऑक्टोबरच्या सायंकाळी 7 ते 10 ऑक्टोबरच्या पहाटे दरम्यान त्यांच्या वरताळा येथील शेतातून 1 लाख 15 हजार रुपये किंमतीचे दोन बैल कोणी तरी चोरून नेले आहेत. या प्रकरणी मुखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गिते अधिक तपास करीत आहेत.
दि.13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 ते 5.30 वाजेदरम्यान विठ्ठल शंकरराव वानखेडे आणि त्यांच्या आई नांदेडच्या बसस्थानकात असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांचा 7 हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि त्यांच्या आईच्या गळ्यातील 20 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र चोरून नेले आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार राठोड अधिक तपास करीत आहेत.
