नांदेड(प्रतिनिधी)-दक्षीण मध्य रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिवाळीतील रेल्वे प्रवाशांची गर्दी पाहता नांदेड-काकीनाडा टाऊन आणि परत काकीनाडा टाऊन-नादेड तसेच नांदेड-बेहरामपुर परत बेहरामपुर-नांदेड अशा दोन गाड्या ऑक्टोबर महिन्यात सुरू केल्या आहेत.
दि.17, 24 आणि 31 ऑक्टोबर 2022 रोजी नांदेड येथून काकीनाडा टाऊन जाणारी रेल्वे गाडी दुपारी 2.25 वाजता सुटेल तसेच ही गाडी काकीनाडा टाऊन येथे सकाळी 8.10 वाजता पोहचेल. या गाडीचा क्रमांक 07487 असा आहे. ही गाडी परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07488 या क्रमांकाने काकीनाडा येथून सायंकाळी 6.20 वाजता सुटेल आणि नांदेडला दुपारी 15.10 वाजता पोहचेल परतीची गाडी 18, 25 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर रोजी धावणार आहे. नांदेड येथून काकीनाडाकडे जाणारी गाडी सोमवारी सुटेल आणि काकीनाडा येथून नांदेडकडे येणारी गाडी मंगळवारी निघेल.
नांदेड ते बेहरामपूर जाणारी गाडी क्रमांक 07431 ही गाडी दर शनिवारी नांदेड येथून दुपारी 3.25 वाजता निघेल आणि बेहरामपुरला दुपारी 2.30 वाजता पोहचले. ही गाडी दि.22, 29 ऑक्टोबर रोजी धावणार आहे. परतीच्या प्रवासात बेहरामपूर येथून निघणाऱ्या गाडीचा क्रमांक 07432 आहे. ही गाडी बेहरामपुर येथून रविवारी दुपारी 4.30 वाजता निघेल आणि नांदेडला दुपारी 3.45 वाजता पोहचेल. बेहरामपुर येथून निघणारी गाडी 16, 23, 30 ऑक्टोबर रोजी धावणार आहे.
काकीनाडाकडे जाणारी गाडी मुदखेड, निजामाबाद, सिकंदराबाद, काझीपेठ, वरंगल, कोंडापल्ली, राजमुद्री, संबलकोठ मार्गे धावेल. बेहरामपूरकडे जाणारी गाडी सिकंदराबाद, संबलकोट, अण्णावरम, डुव्वाडा, कोटावलसा, पलासा मार्गे बेहरामपुरला जाईल. प्रवाशांनी या दोन नवीन गाड्यांचा आपल्या प्रवासासाठी वापर करावा असे आवाहन दक्षीण मध्य रेल्वे विभागाने केले आहे.
