ताज्या बातम्या नांदेड

लाखो रुपयांच्या थकबाकीसाठी मनपाने केल्या 7 मालमत्ता सिल

नांदेड(प्रतिनिधी)-थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्या एकूण 7 मालमत्ता सिल करून महानगरपालिकेने मालमत्ता कर वेळेत भरण्याची सुचना नांदेडच्या नागरीकांना केली आहे.

मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशानुसार थकीत मालमत्ता कर वसुली करण्याची मोहिम जोरदारपणे राबविण्यात येत आहे. सर्वच क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत थकबाकी असलेल्या मालमत्ता भरपूर आहेत. दामुअण्णा दांडेगावकर यांच्या एकत्रीत सात मालमत्तांवर 5 लाख 85 हजार 747 रुपये थकबाकी आहे. त्यामुळे त्यांच्या तीन मालमत्ता सिल करण्यात आल्या आहेत. याशिवाय दत्तात्रय आत्माराम रुद्रावार यांच्याकडे जवळपास 4 लाख रुपये थकबाकी रक्कम शिल्लक आहे. उत्तम किशनराव जाधव यांच्याकडे 5 लाख 87 हजार 747 रुपये थकबाकी आहे. शिवाजी पतसंस्था मंगल कार्यालय यांच्याकडे 3 लाख 13 हजार 885 रुपये थकबाकी आहे. भगवतीबाई हैबते यांच्याकडे 83 हजार 217 रुपये थकबाकी आहे. अशा प्रकारे महानगरपालिकेने सात मालमत्तांना सिल लावले आहे.

या कार्यवाहीत अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, निलेश सुंकेवार, राजेश चव्हाण, साहेबराव ढगे, रमेश चौरे, राहुलसिंह चौधरी, डॉ. रईसोद्दीन, सुधिरसिंह बैस यांनी या कार्यवाहीत सहभाग घेतला. महानगरपालिकेच्यावतीने शास्तीमाफी योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेत वेळेत आपली थकबाकी रक्कम भरून जनतेने आपली मालमत्ता सिल होण्यापासून वाचवावी असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *