नांदेड,(प्रतिनिधी)- कंधार तालुक्यातील मौजे घोडज येथील घर फोडून त्यातील 3 लाख 51 हजार रुपयांचा ऐवज चोरीला आहे. स्वातंत्र्यसैनिक कॉलनी येथील एक घर फोडून छोट्यांनी 61 हजार रूपये किमतीचा ऐवज लांबवला आहे. हदगाव येथील महिला गृह उद्योगातील दहा अश्वशक्तीची 15 हजारांची मोटर चोरीला गेली आहे. कुंडलवाडी येथील मंदिरातून दुर्गा मूर्तीचा चांदीचा मुकुट, बारा हजार पाचशे रुपये किमतीचा चोरट्यांनी चोरला आहे.
घोडज येथील तातेराव नारायणराव चोंढे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.11 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11:30 ते दुपारी दोन वाजे दरम्यान ते आणि त्यांचे कुटुंबीय घराला कुलूप लावून शेतीच्या कामासाठी गेले असताना त्यांच्या घराचा कुलूप कोंडा तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने
आणि रोख रक्कम असा 3 लाख 51 हजार चोरुन नेला आहे. कंधार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर अधिक तपास करीत आहेत.
नांदेड शहरातील स्वातंत्र्यसैनिक कॉलनी मध्ये राहणाऱ्या श्रीमती जयभारत कोटूरवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान त्यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी त्यातून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 61 हजारांचा ऐवज चोरला आहे. याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा ् दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
हदगाव येथील हरदेव बाबा महिला गृह उद्योग देवी नगर तांडा येथील अलका अरविंद राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान त्यांच्या हरदेव बाबा महिला गृह उद्योग या कारखान्यातून कोणीतरी चोरट्याने 10 शिवशक्ती क्षमतेची पंधरा हजार रुपये किमतीची मोटार चोरून नेली आहे. हदगाव पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस अंमलदार हंबर्डे करीत आहे.
रमेश हनमनलू इरलावार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते 7 वाजे दरम्यान नवरात्र गल्ली येथील नवरात्र दुर्गा महोत्सव समिती च्या मंदिरातील दुर्गा मातेच्या डोक्यावरील बारा तोळे चांदीच्या 12 चोळी चांदीचा मुकुट बारा हजार पाचशे रुपये किमतीचा कोणीतरी चोरून नेला आहे. कुंडलवाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.