नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाचे कर्मचारी आपल्या खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन किंवा शासनाचे बोधचिन्ह वापरतात. याबद्दल आलेल्या एका तक्रारीला अनुसरून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांना पत्र पाठवून अशा प्रकारचे महाराष्ट्र शासन किंवा शासनाचे बोधचिन्ह छापलेले असेल, प्रदर्शित केले असेल तर ते काढून टाकण्यात यावेत असे आदेश दिले आहेत.
संदीप निमसे यांनी जारी केलेल्या पत्रानुसार मोटार वाहन कायदा १९८९ कलम १३४ नुसार खाजगी वाहनांवर किंवा वाहनात कोणतेही शासनाचे बोधचिन्ह लावण्यात आले असेल तर ते बेकायदेशीर आहे. अशा परिस्थितीत आपल्या कार्यालयातील सर्व खाजगी वाहनांना तपासून त्या वाहनांवर महाराष्ट्र शासन लिहिले असेल किंवा शासनाच्या बोधचिन्हाचा उल्लेख असेल तर ते सर्व वाहनांवर काढण्यात यावेत. ही तक्रार बहाद्दरपूरा ता. कंधार येथील ऍड. बालाजी दत्ता कांबळे यांनी केली होती.
