ताज्या बातम्या नांदेड

संजय बियाणी खुन प्रकरणात मकोका न्यायालयात 4123 पानांचे दोषारोपपत्र दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायीक संजय बियाणी यांचा दि. 05 एप्रिल 2022 रोजी त्यांच्याच घरासमोर दोन अज्ञात शुटर्स यांनी फायरींग करून खुन केला होता. सदर घटनेचे अनुषंगाने पोलीस ठाणे विमानतळ येथे गुन्हा रजिस्टर क्र. 119/2022 कलम 302,307,34 भादवि सहकलम 3/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करून सदर गुन्हयाचे तपासकामी निसार तांबोळी, पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र नांदेड यांनी प्रमोदकुमार शेवाळे, पोलीस अधिक्षक, नांदेड यांचे नियंत्रणात विशेष तपास पथकाची स्थापना केली होती.

 

सदर विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम करून नमुद गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केले. ज्यामध्ये कुख्यात गुन्हेगार आरोपी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा चरणसिंघ संधु याने स्वतःच्या आर्थीक फायद्यासाठी संघटीत गुन्हेगारांची टोळी तयार करुन गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असुन सदर गुन्हयात आरोपी इंद्रपालसिंघ उर्फ सन्नी पिता तीरतसिंग मेजर. रा. चिखलवाडी कॉर्नर नांदेड, मुक्तेश्वर उर्फ गोलु विजय मंगनाळे, रा. नाईकनगर नांदेड,सतनामसिंग उर्फ सत्ता दलबिरसिंग शेरगील रा. शहीदपूरा गेट नं. 06 नांदेड, हरदिपसिंघ उर्फ सोनु पिनीपाना सतनामसिंग बाजवा, रा. रामदास यात्रीनिवास नांदेड, गुरमुखसिंग उर्फ गुरी सेवासिंग गिल रा. गेट नं. 06 शहीदपूरा नांदेड, करणजितसिंग रघबिरसिंग शाहु रा. गेट नं. 03 बडपूरा नांदेड, हरदिपसिंग उर्फ हार्डी उर्फ लकी बबनसिंग सपुरे रा. यात्री निवास रोड गणपत निवास मराठवाडा एकजुट प्रेसजवळ नांदेड, कृष्णा उर्फ पप्या धोंडीबा पवार रा. आमदुरा ता. मुदखेड जि. नांदेड, हरीष मनोज बाहेती, वय 28 वर्षे रा. मारवाडगल्ली, वजीराबाद, नांदेड, रणजीत सुभाषराव मांजरमकर, रा. वैशाखीनगर नांदेड, सरहानबिन अली अलकसेरी, रा. अरबगल्ली किल्ला रोड नांदेड, गुरुप्रितसिंघ उर्फ दान्या उर्फ सोनी पिता गुलझारसिंघ खैरा रा. दशमेशनगर बाफनाजवळ नांदेड, कमलकिशोर गणेशलाल यादव, रा. दिलीपसिंघ कॉलनी वजीराबाद, नांदेड, यांना अटक करण्यात आलेली असुन फरार असलेले आरोपी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा चरणसिंघ संधु वय 38 वर्षे अंदाजे रा. गुरुद्वारा गेट नं. 05 शहीदपूरा नांदेड, सुनिल उर्फ दिपक पिता सुरेश रा. सुरखापूर जि. झज्जर राज्य हरीयाणा, दिव्यांशु उर्फ पहेलवान रामचेत. रा. कुतुबपूर पोस्ट पूराबाझार जि. अयोध्या राज्य उ. प्रदेश यांचा गुन्हयात सहभाग दिसुन आला आहे. सदरचा गुन्हा हा आर्थीक फायद्यासह, संघटीतरित्या केला असल्याने सदर गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1) (i).3(2),3 (4) वाढीबाबतचा प्रस्ताव निसार तांबोळी, पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र नांदेड यांचेकडे पाठविण्यात आला. त्यांनी सदर कलमवाढ करणेबाबतची परवानगी दिली. त्यावरुन सदर गुन्हयाचा तपास अर्चित चांडक, सहाय्यक पोलीस अधिक्षक, उप विभाग बिलोली यांचेकडे देण्यात आला. त्यांनी सदर गुन्हयात कलम वाढ करुन आरोपीतांना मोक्का न्यायालयात हजर करुन त्यांची पोलीस कोठडी रिमांड घेऊन तपास केला आहे. गुन्हयाचे तपासात वर नमुद आरोपीतांविरुध्द पुरावे हस्तगत करण्यात येऊन उपलब्ध पुराव्याचे आधारे सदर गुन्हयाचे तपासीक अधिकारी अर्चित चांडक, सहाय्यक पोलीस अधिक्षक, उप विभाग बिलोली कॅम्प नांदेड यांनी 16 आरोपीतांविरुध्द 4123 पाने समाविष्ठ असलेले दोषारोप तयार केले.

 

‘सदरचे दोषारोप पत्र निसार तांबोळी, पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र नांदेड, प्रमोदकुमार शेवाळे, पोलीस अधिक्षक, नांदेड, पोलीस अधीक्षक, भोकर, यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चित चांडक, सहाय्यक पोलीस अधिक्षक, उप विभाग बिलोली कॅम्प नांदेड यांनी आज दिनांक 07 ऑक्टोंबर 2022 रोजी दोषारोप पत्र क्रमांक 128/2022 दिनांक 05.10.2022 प्रमाणे म को का न्यायालय, नांदेड येथे दाखल केले असुन ज्याचा स्पेशल मोक्का कोर्ट केस क्रमांक 98/2022 दिनांक 07.10.2022 असा आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *