नांदेड,(प्रतिनिधी)- मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील २२ प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या आणि २३ जिल्हा न्यायाधीशांच्या बद ल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यात नांदेडचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांची बदली मुंबई येथे स्मॉल काज कोर्ट मध्ये मुख्य न्यायाधीश पदावर करण्यात आहे. त्यांच्या जागी मुख्य न्यायाधीश औद्योगिक न्यायालय मुंबई येथील एन.व्ही.न्हावेकर यांना नांदेड प्रमुख जिल्हा न्यायधीश पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी महाप्रबंधक यांची स्वाक्षरी आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक यांनी ७ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील २२ प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नांदेड येथील श्रीकांत अणेकर यांना मुंबईला पाठवण्यात आले आहे.त्यांच्या जागी मुंबई येथील एन.व्ही.न्हावेकर याना नियुक्ती देण्यात आली आहे.
बदल्या केलेल्या नांदेड येथील प्रमुख जिल्हा न्यायाधिशांसह यांच्यासह हिंगोली,यवतमाळ,कोल्हापूर,जळगाव,गोंदिया येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.सोबतच इतर जिल्हा न्यायाधीशांच्या पदातील २३ जणांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
या बातमी सोबत उच्च न्यायालयाने जारी केलेल्या बदल्यांच्या आदेशाची पीडीएफ फाईल वाचकांच्या सोयी साठी जोडली आहे.